Dignitary while inaugurating the 'Bharat Jodo-Maharashtra Jodo' campaign.  esakal
जळगाव

Bharat Jodo Abhiyan : लोकसभा निवडणूकीत मोदी सरकारला रोखणार; 130 जनसंघटनांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

Bharat Jodo Abhiyan : केंद्र शासनाची फॅसिस्ट राजवट येत्या २०२४ मध्ये पायउतार न केल्यास भारत आपली लोकशाही धर्मनिरपेक्ष ओळख हरवून बसेल. पुन्हा वर्ण वर्चस्ववादी व्यवस्थेचे आपण गुलाम होऊ.

म्हणून कोणाला सत्तेत बसवायचे यासाठी नव्हे, तर केंद्रातील उन्मादी धर्मान्ध सरकार रोखण्यासाठी व हुकूमशाही राजवटीचा अंत करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व परिवर्तनवादी संघटनांतर्फे ‘भारत जोडो- महाराष्ट्र जोडो’ अभियान राबविण्यात येत आहे. (determined to stop Modi government in Lok Sabha election by Bharat Jodo campaign jalgaon news)

याद्वारे २०२४ च्या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने मोदी सरकारला रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार अभियानाच्या उद्‌घाटन सत्रात केला गेला.

येथील एमआयडीसीतील विणूज वर्ल्डमध्ये शनिवारी (ता. १) महाराष्ट्रातील जनसंघटनांच्या प्रतिनिधींचे समता, सामाजिक न्याय व बंधुभाव आधारित राष्ट्रवादाच्या समर्थनार्थ दोन दिवसीय संमेलन सुरू झाले. यावेळी मान्यवरांनी हा निर्धार केला. उद्‌घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी भारत पाटणकर (श्रमिक मुक्ती दल, मुंबई) होते.

तर, प्रमुख अतिथी म्हणून मराठा महासंघाचे चंद्रशेखर शिखरे, सुभाष वारे (संविधान बचाव अभियान), सुरेश खोपडे, फैजल खान, विश्‍वास उडगी (मुंबई), एम. एच. दर्डा (औरंगाबाद), संजय सिंग, निता मिश्रा (उत्तर प्रदेश), विजय महाजन (दिल्ली), अजित झा (दिल्ली), दीपक लांबा (मुंबई), कुसुम अलाम (चंद्रपूर), निमंत्रक प्रतिभा शिंदे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष मुकुंद सपकाळे, जनक्रांती मोर्चा स्वागत समिती सदस्य डॉ. करिम सालार, लीलाताई पवार, राज्य कोअर टीमच्या उल्का महाजन आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वेळी सर्व वक्त्यांनी सध्याची देशातील व राज्यातील परिस्थिती चिंताजनक असून, अप्रत्यक्ष हुकूमशाही येथील जनतेवर लादली गेली असल्याचे मत नोंदविले. लोकशाही व संविधान यांची गळचेपी सुरू आहे. या देशात भयाचे वातावरण तयार करून अल्पसंख्यांक, दलित व आदिवासींवर अत्याचार वाढले आहेत.

येथील शेतकरी, कष्टकरी व कामगारांच्या विरोधी धोरणे राबविले जात आहेत. हे सारे केंद्र सरकारच्या पाठींब्याने सुरू आहे. ही केंद्र शासनाची फॅसिस्ट राजवट येत्या २०२४मध्ये पायउतार केली नाही, तर भारत आपली लोकशाही धर्मनिरपेक्ष ओळख हरवून बसेल, असेही या वेळी सांगण्यात आले.

डॉ. मिलिंद बागुल यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सत्यजित साळवे यांनी आभार मानले. दोन दिवस या संमेलनात विविध समस्यांवर गटांमध्ये चर्चा केली जाऊन त्यातून पुढील कृती कार्यक्रमाची आखणी व नियोजन केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT