jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News: पाडळसरेत 3 कोटींतून होणार विकासकामे; पुनर्वसित गावठाणात पाणी योजना

सकाळ वृत्तसेवा

कळमसरे (ता. अमळनेर) : तापी नदीवरील पाडळसरे धरणामुळे विस्थापित झालेल्या नवीन पुनर्वसित गावठाणात पाणीपुरवठा योजना, अंगणवाडी, रस्ता व मुख्य गाव दरवाजा अशा तीन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद असलेल्या विकासकामांचे आमदार अनिल पाटील व सरपंच शुभांगी पाटील यांच्या यांच्याहस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले.

विस्थापित पाडळसरे गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी व कळमसरे ते पाडळसरे धरणापर्यंत अवजड वाहने वापरून खराब झालेल्या मुख्य रस्त्यासाठी ग्रामपंचायतीकडून झालेल्या मागणीनुसार जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी ७ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना तर १ कोटी ५० लाख रुपयांचा कळमसरे ते पाडळसरे धरणापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण व मजबूतीकरण करणे.

यासह अद्ययावत अंगवाडी बांधकामासाठी ८ लाख ५० हजार , गाव अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी १० लाख, मुख्य रस्त्यावर गावदरवाजासाठी ८ लाख, एक किलोमीटर पाणंद रस्त्यासाठी ७ लाख रुपये अशा एकूण तीन कोटी रुपयांची विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

या वेळी कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, सरपंच शुभांगी पाटील, उपसरपंच शिवाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील, प्रकाश भदाणे, दिलभर भिल, ग्रामपंचायत सदस्या कविता पाटील, भारती कोळी, अक्काबाई भिल, वच्छाबाई भिल, माजी सरपंच सचिन पाटील, शांतता समितीचे सदस्य वसंतराव पाटील, भागवत पाटील,

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

कळमसरे ग्रामपंचायत उपसरपंच पिंटू राजपूत, भूषण पाटील, विकास पाटील, गोकुळ पाटील, मंगल पाटील, शत्रुघ्न पाटील, संजय पाटील, राजेंद्र पाटील, रामकृष्ण पाटील, जगदीश भदाणे, माजी उपसरपंच रवींद्र पाटील, सचिन कोळी, संदीप पाटील, चंद्रकांत पाटील, हरिष पाटील, रामसिंग कोळी, डॉ. अविनाश पाटील, ईश्वर गुर्जर, मनोज पाटील, समाधान गुर्जर, जयसिंग कोळी, मंगल गुर्जर, समाधान पाटील, मधुकर गुर्जर आदींची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमात भागवत पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर सचिन पाटील यांनी आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT