मद्याच्या कारखान्यावर छापा sakal
जळगाव

धुळ्यात बनावट मद्याच्या कारखान्यावर छापा

मद्याच्या कारखान्यावर शहर पोलिस पथकाने छापा टाकत धडक कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील विद्युतनगरातील भरवस्तीतील बनावट मद्याच्या कारखान्यावर शहर पोलिस पथकाने छापा टाकत धडक कारवाई केली. यात बनावट दारूसह ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी महिलेला ताब्यात घेतले असून, मुख्य संशयित तिचा पती फरारी आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

विद्युतनगरातील डेअरीमागे मयूर मच्छिद्र शार्दुल घरात बनावट मद्य बनवून त्याचा साठा तसेच चोरट्या मार्गाने विक्री करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक दादासाहेब पाटील यांना मिळाली. त्यांच्यासह पथकाने रविवारी (ता. २४) सायंकाळी घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईत ५७ हजार ६०० रुपयांचे २० मद्याचे बॉक्स, सहा हजार ६०० किमतीच्या १४ पांढऱ्या गोण्यांमध्ये भरलेल्या १८० एमएलच्या रिकाम्या बाटल्या, दोन हजारांचे बाटल्यांचे बूच, ७२० रुपयांच्या पिण्याच्या पाण्याच्या ३६ बाटल्या आणि दोनशे रुपयांचे दोन ३५ लिटर क्षमतेचे कॅन, असा ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी संशयित महिलेला ताब्यात घेतले. तिला न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली. मुख्य संशयित मयूर शार्दुल रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, तो फरारी आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे व शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दादासाहेब पाटील, कैलास दामोदर, हवालदार विलास भामरे, मुक्तार मन्सुरी, मनीष सोनगिरे, प्रवीण पाटील, विवेक साळुंखे, अविनाश कराड, नीलेश पाटील, गौरव देवरे, तुषार मोरे, गुणवंत पाटील, शाकीर शेख, मोरे, सुशीला वळवी यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata News: चंद्रशेखरन यांचा U-Turn? पुन्हा Tata चेअरमनपदी निवड! निर्णय होताच शेअर्स 5% वाढले; नेमकं काय घडलं?

UPI MDR 2026 : अमेरिकेच्या दबावामुळे युपीआय वर एमडीआर? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Asian Games 2026 Cricket : पाकिस्तानला दुबळ्या थायलंडने रडवले, शेजारी २ चेंडू राखून कसेबसे जिंकले; चीन न खेळताच स्पर्धेबाहेर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

Latest Marathi News Update : 'निवडणूक आयोगाला आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यापासून अनिश्चित काळासाठी रोखले जाऊ शकत नाही'

SCROLL FOR NEXT