ST Bus Sakal
जळगाव

मित्राच्या मदतीने ST कर्मचाऱ्यानेच केली डिझेलची चोरी!

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : शहरातील पेट्रोलपंपावरून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याने दोघांच्या मदतीने बसमध्ये डिझेल भरण्याच्या नावाखाली खासगी वाहनात ६७ लिटर डिझेल भरून डिझेलची चोरी केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातील लिपीक संभाजी भास्कर काळे (रा. सायगाव, ता. चाळीसगाव) हा आपल्या दोघा मित्रांच्या सहकार्याने बसेसमध्ये डिझेल भरताना कमी भरुन जास्तीचे बिल घ्यायचा. बसचालक डिझेल भरल्यानंतर विश्‍वासाने सह्या करायचे. १० ते १४ मे दरम्यान संभाजी काळे याने शहरातील जयशंकर पेट्रोल पंपावर राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये (क्रमांक (एम. एच. २० बीएल २४१२, एम. एच. ४० एन ९८१६, एम. एच. २० बीएल २३५७ व एम. एच. २० बीएल ३५०७) अशाच प्रकारे बिलाप्रमाणे डिझेल न भरता, परस्पर खासगी वाहनात ६७ लिटर डिझेल भरले. डिझेलची ही चोरी करण्यासाठी त्याला मौसीन सलीम शेख (रा. जुने विमानतळ, चाळीसगाव) व मयूर नामदेव म्हस्के (रा. मराठी शाळेच्यामागे, खरजई नाका, चाळीसगाव) यांनी मदत केली. त्यामुळे या तिघांनी ६७ लिटर डिझेलची चोरी केल्याचे समोर आल्याने आगार प्रमुख संदीप निकम यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीसात या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिझेलची ही चोरी नेमकी किती दिवसांपासून सुरु होती व यात आणखीन कोण कोण सहभागी आहे, यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane lands on moving car Video : भयानक दुर्घटना!, विमान थेट भरस्त्यावरील धावत्या कारवरच झालं लँड अन्..

Mumbai MHADA: म्हाडाची मोठी घोषणा! 'या' १६ सुविधा भूखंडांसाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू; अर्ज कसा करायचा?

Pune Porsche Accident : पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणातील दोन पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ; चौकशीत गंभीर त्रुटी आढळल्या!

Paithan Robbery : दावरवाडी येथे शेतात जाणाऱ्या महिलेस भरदुपारी चोरट्यांनी लुटले; पाचोड पोलिसात गुन्हा दाखल!

Latest Marathi News Live Update : मांजा विक्रेत्यावर पोलिसांचा छापा; एक ताब्यात

SCROLL FOR NEXT