digging by Municipality at 55 places on ready roads jalgaon news
digging by Municipality at 55 places on ready roads jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : तयार रस्त्यांवर 55 ठिकाणी मनपाकडून खोदकाम! मक्तेदाराकडून 30 वेळा पत्रव्यवहार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : रस्त्यांच्या कामासाठी मंत्री, आमदार शंभर कोटींच्या निधीचे दावे करीत असताना, इकडे महापालिकेने तयार रस्ते खोदण्याचा सपाटा लावला आहे. (digging by Municipality at 55 places on ready roads jalgaon news)

४२ कोटींच्या निधीतून सुरू असलेल्या रस्त्याचे काम झाल्यावरही हे रस्ते ५५ ठिकाणी खोदून ठेवले आहेत. हैराण झालेल्या मक्तेदाराने बांधकाम विभाग, महापालिकेकडे किमान ३० वेळा पत्रव्यवहार करूनही यंत्रणांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने रस्ते तयार होऊनही दुर्दशा होतेय.

जळगाव शहरात गेल्या सात ते आठ वर्षांपासून रस्त्यांची प्रचंड दुरवस्था होऊन नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. ‘अमृत’ योजनेतील पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेच्या कामाने तर अख्ख्या जळगाव शहराचा सत्यानाश करून ठेवला आहे.

कोटींचा निधी खड्ड्यात

चालणेही कठीण झालेल्या रस्त्यांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी शंभर कोटींचा निधी दिला. तो वापरण्यात अनेक अडसर आले. अखेरीस त्यापैकी ४२ कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे मार्गी लागली. शहरातील प्रमुख रस्ते या निधीतून होत असताना, तयार रस्त्यांवर काही ना काही काम काढून महापालिकेकडून खोदकाम सुरू आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

कधी चेंबरच्या नावाखाली, कधी गटार, तर कधी अमृतच्या जलवाहिनीच्या नावाखाली सातत्याने खोदकाम सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू झाले, की महापालिकेची यंत्रणा पाठोपाठ खोदायला तयार असते, असा नेहमीचा अनुभव आहे. त्यामुळे आता रस्त्यांसाठीचा हा कोट्यवधींचा निधी पुन्हा खड्ड्यात जाण्याची चिन्हे आहेत.

तीस वेळा पत्रव्यवहार

४२ कोटींच्या निधीतील रस्त्यांची कामे एकाच मक्तेदाराला सोपविली आहेत, तर शासकीय एजन्सी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्यावर नियंत्रण आहे. हद्दीमुळे महापालिकेचे ना हरकत पत्र प्रत्येक कामासाठी आवश्‍यक आहे. त्यामुळे यातील बहुतांश रस्त्यांच्या कामासाठी महापालिकेने ना हरकत पत्र देण्यासही चालढकल केल्याचे बोलले जाते.

तयार रस्त्यांवर खोदकाम करणे, रस्त्यांची कामे सुरू करणे यांसह अन्य तांत्रिक बाबींसाठी मक्तेदाराने बांधकाम विभागाकडे सातत्याने तब्बल ३० वेळा पत्रव्यवहार केला. तरीही खोदकामात सुधारणा झालेली नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटलांनाही याबाबत साकडे घालण्यात आले, तरीही तयार रस्त्यांवर खोदकाम थांबलेले नाही.

कोटिंग थांबलेलेच!

या निधीतील बऱ्यापैकी रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. मात्र, जे रस्ते तयार आहेत त्यावर कारपेट, सीलकोट असे दोन थराचे कोटिंग बाकी आहे. ते होत नाही, तोवर रस्त्यांना मजबुती येणार नाही. मात्र, महापालिकेच्या खोदकामाच्या धोरणामुळे हे कोटिंग अद्याप थांबलेलेच आहे.

...तर मनपा जबाबदारी घेणार का?

तयार रस्त्यांवर खोदकाम केल्यानंतर महापालिकेकडून तात्पुरती दुरुस्ती, पॅचवर्क करण्यात येईल, असे सांगण्यात येते. प्रत्यक्षात महापालिकेची यंत्रणा ही दुरुस्ती अगदीच निकृष्ट दर्जाची करते. त्यामुळे त्या दुरुस्तीवर होणाऱ्या नवीन रस्त्याच्या कामावर परिणाम होतो. चांगले मटेरियल वापरूनही रस्त्याची गुणवत्ता टिकत नाही. अशा स्थितीत मक्तेदाराने या रस्त्यांच्या देखभाल- दुरुस्तीची जबाबदारी घेण्यास नकार दिला असून, रस्ते खोदणारी महापालिका या रस्त्यांची ही जबाबदारी स्वीकारले का, हा प्रश्‍न आहे.

"तयार रस्त्यांवर महापालिकेकडून खोदकाम सुरू आहे. असे अनेक रस्ते तयार झाल्यानंतर खोदल्यामुळे त्यांची मजबुती धोक्यात आली आहे. असेच सुरू राहिले, तर चांगले रस्ते तयार करूनही ते टिकणार नाहीत. रस्त्याचे काम सुरू होण्याआधीच महापालिकेने सर्व प्रकारची कामे करून घेतली पाहिजेत." -आदित्य खटोड, संचालक, श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Threats to Hindu leaders: पाकमधले सिमकार्ड मराठवाड्यातल्या मोबाईलमध्ये! काय आहे हिंदू नेत्यांच्या धमकीचे नांदेड कनेक्शन

BCCI अन् टीम इंडिया टेन्शनमध्ये! टी-20 वर्ल्ड कपपूर्वी सलामीची जोडी IPL मध्ये ठरली अपयशी

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या VVIP ड्युटीवर बोगस डॉक्टर, अयोध्या दौऱ्यात भयंकर सुरक्षा त्रुटी

World Economy: 2075मध्ये चीन पहिल्या क्रमांकावर तर अमेरिका सर्वात श्रीमंत असेल, भारत कुठे असणार?

Latest Marathi News Live Update: स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी केजरीवालांच्या माजी 'पीए'ला समन्स

SCROLL FOR NEXT