Copy Free Exam Campaign
Copy Free Exam Campaign  esakal
जळगाव

Copy Free Exam Campaign : जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियान ; जिल्हाधिकारी मित्तल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बारावीची परीक्षा येत्या २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मार्च महिन्यात दहावीची परीक्षा (Exam) आहे.

या दोन्ही परीक्षेत जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलिस विभाग कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबविणार आहे. (District Administration Zilla Parishad Police Department will effectively implement copy free exam campaign jalgaon news)

त्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सोबत कॉपी पुरविणाऱ्या रॅकेटचा शोध घेऊन कारवाई करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये, पालकांही प्रोत्साहन देऊ नये.

आजचे विद्यार्थी उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. ते कॉपी करून पास झाले, तर त्यांचे उज्वल भवितव्य कसे होणार? कापी पुरविताना आढळल्यास संबंधितासह

शाळेच्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मित्तल म्हणाले, की कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाल्या नाहीत, तर शाळा स्तरावर परीक्षा झाल्या होत्या. त्यामुळे या वर्षी परीक्षेत कॉपी करण्याचे व कॉपी पुरविण्याचे गैरप्रकार होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व विभागांकडून एकत्रितपणे प्रयत्न केले जाणार आहेत. यास पालक, विद्यार्थी, संस्थाचालक, मुख्याध्यापक, माध्यमे व शिक्षकांनी सहकार्य करावे.

१२ अतिसंवेदनशिल केंद्रे

हे अभियान राबविताना परीक्षा केंद्रांची ‘अतिसंवेदनशील, संवेदनशील व सर्वसाधारण’, अशी वर्गवारी करण्यात येणार आहे. कॉपीचे प्रकार होणाऱ्या परीक्षा केंद्रावर विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येईल.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक, भरारी पथकही नियुक्त केले जाणार आहेत. ठराविक पेपरच्या दिवशी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक विविध केंद्रांना भेटी देणार आहेत. विद्यार्थ्यांची झडतीही घेतली जाणार आहे.

जीपीएस लोकेशन

गोपनीय परीक्षा साहित्य घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांचे जीपीएस लोकेशन घेतले जाणार आहे. जास्त कॉपीचे प्रकार घडतील, त्या परीक्षा केंद्राच्या संचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यात गैरप्रकार झाल्यास त्याची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन नंबर दिला जाईल.

या तक्रारीची दखल घेऊन तत्काळ त्याठिकाणी पोलिस व इतर पथक पोचणार आहेत. परीक्षा केंद्रावर ५० मीटरच्या आत कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला प्रवेशास बंदी राहणार असून, परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्र परिसरात सीसीटीव्हीचीही नजर राहणार आहे.

डॉ. आशिया यांनी सांगितले, की जिल्ह्यात हे अभियान यशस्वी होण्यासाठी संस्थाचालक, मुख्याध्यापकांची बैठक घेतली असून, त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील १२ संवदेनशील परीक्षा केंद्रावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.

नरिक्षेत कॉपी करणारे व पुरविणारे यांचेवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बंदोबस्तासाठी पोलिसांबरोबरच होमगार्डही कार्यरत राहणार आहेत, असे पोलिस अधीक्षक रामकुमार यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यात १२ वीच्या परीक्षेसाठी ७६ परीक्षा केंद्रावर ४७ हजार ३७० तर दहावीच्या परीक्षेसाठी १३८ परीक्षा केंद्रावर ५६ हजार ८६५ विद्यार्थी प्रविष्ट होणार असल्याचे शिक्षणाधिकारी श्री. बच्छाव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT