Officials from the Agriculture Department came to register a case at the police station  esakal
जळगाव

Jalgaon News : खत कंपनी, होलसेलरसह 3 डीलर्सचा परवाना निलंबित; जिल्हा कृषी विभागाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जामनेर तालुक्यातील १३ गावांत सरदार ॲग्रो फर्टिलायझर केमिकल प्रा. लिमिटेड (गुजरात) या कंपनीचे खत वापरल्याने २२५ शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते. त्याची तक्रार कृषी विभागाकडे करण्यात आली होती.

या प्रकरणी तालुका तक्रार निवारण समिती अहवालात नोंदवलेल्या निष्कर्षांवरून संबंधित कंपनीसह जळगाव येथील घाऊक खत व्यापारी व जामनेर येथील तीन किरकोळ विक्रेत्यांविरुद्ध जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तसेच कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या आदेशावरून कंपनीचा खत परवाना व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या आदेशावरून जामनेर तालुक्यातील तीन खत विक्रेत्यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. (District Agriculture Department action suspends license of 3 dealers including fertilizer company wholesaler jalgaon crime news)

जामनेर तालुक्यातील १३ गावांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरदार ॲग्रो फर्टिलायझर केमिकल कंपनीसह जळगाव येथील घाऊक खत व्यापारी (होलसेलर), तसेच येथील तीन किरकोळ विक्रेत्यांविरोधात मोहीम अधिकारी तथा खत निरीक्षक विजय पवार यांनी सोमवारी (ता.१७) जामनेर येथे गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित कंपनीचे खत वापरल्याने २२५ शेतकऱ्यांचे ४२३ हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले होते. याप्रकरणी सर्वप्रथम तोंडापूर येथील शेतकऱ्यांनी जामनेर पंचायत समिती कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर तत्काळ पाल कृषी प्रशिक्षण केंद्र शास्त्रज्ञ अतुल पाटील यांनी पिकाची पाहणी केली होती.

दुसऱ्या दिवशी तहसीलदार नानासाहेब आगळे, उपविभागीय अधिकारी रमेश जाधव (पाचोरा) व मोहीम अधिकारी विजय पवार यांनी जामनेर तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या शेतात पिकाची पाहणी करून जागेवर पंचनामा केला व शेतकऱ्यांच्या शेतातील व तोंडापूर येथील बालाजी ट्रेडर्स या दुकानातून खताचे नमुने घेऊन हैदराबाद व नाशिक येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या ठिकाणी तोंडापूर येथील शेतकऱ्यांच्या वतीने अधिकाऱ्यांच्या समोर आक्रमक पवित्रा घेत कपडे काढून आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेत सोमवारी (ता.१७) जामनेर येथे खत निरीक्षक विजय पवार यांनी सरदार फर्टिलायझर केमिकल कंपनी व पार्श्वनाथ ॲग्रोटेक कानळदा जळगाव येथील डीलर व जामनेर तालुक्यातील तीन किरकोळ विक्रेते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुकानदार याच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश मगनराव अहिरे तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कंपनीचा खताबाबत निष्कर्ष

सरदार ॲग्रो फर्टिलायझर ॲण्ड केमिकल प्रा. लिमिटेड कंपनीच्या उत्पादित सिंगल सुपर फॉस्फेट खतामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे तालुका तक्रार निवारण समिती अहवालात निष्कर्ष नोंदविलेला असल्यामुळे या विक्रेत्यास देण्यात आलेले खत विक्री प्राधिकरण पत्र १५ फेब्रुवारी २०२८ पर्यंत कंपनीचा खत परवाना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश विकास पाटील संचालक कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडून देण्यात आला आहे.

..या विक्रेत्यांचा सहभाग

होलसेल डीलर पार्श्वनाथ ॲग्रोटेक (कानळदा रोड, जळगाव) तसेच बालाजी ट्रेडर्स (तोंडापूर), धनलक्ष्मी कृषी केंद्र (तोरनाळा), अभिषेक कृषी केंद्रीय (मोयखेडा) हे तीन कृषी केंद्र व जळगाव येथील डीलरचा खत विक्री परवाना निलंबित करण्यात येत असून, निलंबित कालावधीत कोणत्याही खताची खरेदी, साठवणूक तसेच विक्री न करण्याचे आदेश जिल्हा कृषी अधिकारी तथा परवाना अधिकारी (जळगाव) रविशंकर चलवदे यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT