Child marriage News esakal
जळगाव

Jalgaon News : बालविवाह न होण्यासाठी दक्षता घ्यावी; जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुक्कावार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ग्रामीण, शहरी भागात बालविवाह होण्याची शक्यता आहे. (District Child Protection Officer Mukkawar alerts about child marriage jalgaon news)

यामुळे ग्रामीण भागात ग्रामसेवक, तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने सतर्क राहून आपल्या भागात बालविवाह होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी सूचना शासनाकडून आलेल्या आहेत. त्यानुसार संबंधित यंत्रणांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा बालसंरक्षण अधिकारी योगेश एस. मुक्कावार यांनी केले आहे.

बालविवाहाचे प्रमाण लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनीही जिल्हा बालसंरक्षण समिती व जिल्हा बालविवाह निर्मूलन आढावा बैठकीत व कार्यवाही करण्याबाबत वेळोवेळी आदेश निर्गमित केले आहेत.

बालविवाह करणे किंवा त्याला उपस्थित राहाणे, हा अजामीन पात्र गुन्हा आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ राज्यात लागू करण्यात आला आहे. त्यानुसार बालविवाह आयोजित करणे गुन्हा आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

महिला व बालविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यामुळे बालविवाह रोखणे आणि बालहक्कांच्या संरक्षणासाठी अधिक सक्षमपणे प्रयत्न होणे आवश्यक आहे.

याबाबतचे पत्र या कार्यालयास प्राप्त झाले आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत. याबाबत योग्य ती कार्यवाही करावी व बालविवाह झाला असेल, त्या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद होणे आवश्यक असल्याचे श्री. मुक्कावार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: गॅसटंचाईमुळे ठाण्यातील ६० टक्के हॉटेल्स बंद, व्यावसायिकांचे चुलीवर स्वयंपाक करत आंदोलन

Pune Traffic: महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे उद्यापासून पुण्याच्या वाहतुकीत बदल; लोणीकंद-खराडी मार्गावर अवजड वाहनांना बंदी

Maharashtra Heatwave: अलर्ट! राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता, उष्णतेची लाट ओसरली

Latest Marathi News Live Update : पोलिस भरती प्रक्रियेत उमेदवारांनी घातला गोंधळ

Pune Crime : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT