Highway esakal
जळगाव

Jalgaon News: राष्ट्रीय महामार्ग लवादाच्या कामात येणार पारदर्शकता; खटल्यांचा जलद होणार निपटारा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग लवाद कामकाजाची कार्यपद्धती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केली. अशा प्रकारची कार्यपद्धती जळगाव जिल्हा लवादासाठी पहिल्यांदा जाहीर झाली. त्यामुळे कामकाजात पारदर्शकता येऊन खटल्यांचा जलद निपटारा होणार असून, लवाद प्रशासन गतिमान होणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग अधिनियम १९५६ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांची राष्ट्रीय महामार्ग लवाद म्हणून नियुक्ती झाली आहे. (District Collector Ayush Prasad announced working procedure of National Highway Arbitrator jalgaon news)

लवाद आणि सामंजस्य कायदा १९९६ मधील तरतुदीनुसार लवादास त्यांच्या समक्ष चालविण्यात येणाऱ्या प्रकरणी स्वतःची कार्यपद्धती निश्चित करण्यासंबंधीचे अधिकार प्रदान देण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यपद्धती जाहीर केली.

आता राष्ट्रीय महामार्गासाठीच्या भूसंपादनासंबंधी लवादात अर्ज दाखल करावयाचा असल्यास तो अर्ज जळगावचे जिल्हाधिकारी तथा राष्ट्रीय महामार्ग लवाद यांच्या कार्यालयात कार्यान्वित असलेल्या लवाद कक्षात टपाल शाखेतर्फे दाखल करून घेण्यात येईल. लवाद कक्षाचे कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील इमारतीत असेल.

राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरणांचे लवाद अर्ज दाखल करून घेणे, त्या अर्जाची छाननी करून नोंदवून घेणे व त्यास नोंदणी क्रमांक देणे, लवाद अर्ज वेळोवेळी लवाद तथा जिल्हाधिकारी यांच्या समक्ष सुनावणीसाठी सादर करणे व लवादाच्या आदेशाप्रमाणे सर्व लवाद अर्जात वेळोवेळी योग्य कायदेशीर कार्यवाही पार पाडण्याची जबाबदारी लवाद कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर राहील.

पहिल्या, तिसऱ्या गुरुवारी सुनावणी

जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील न्यायदालनात नमूद प्रकरणी तशी सुनावणीची नोटीस दिल्यावर दर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी सकाळी अकराला सुनावणीची कार्यवाही होईल. लवाद अर्जाचे कामकाज प्राधान्याने मराठी भाषेतून चालविण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई संकटात असताना झालेला कोविड सेंटर घोटाळा, सत्तेचा गैरवापर अन् नियमांचं उल्लंघन

Jalgaon Municipal Election जळगावात ठाकरे गटाची सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष मदत? प्रवीण माळी यांच्या निर्णयाने खळबळ

MPSC Success Story: संघर्ष पाचवीलाच... तरी केदार गरड बनला क्लासवन अधिकारी; एमपीएससीत राज्यात प्रथम, परिस्थितीवर मात करत यशाला गवसणी!

Nitesh Rane : शहराचे नाव बदलण्याचे षड्‍यंत्र; मंत्री नीतेश राणेंची शिवसेना यूबीटीवर टीका

Viral Video : तरुणीची मदत करणे तरुणाला चांगलेच पडले महागात, तुम्ही देखील 'ही' चूक करु नका; पाहा नेमकं काय घडलं ?

SCROLL FOR NEXT