District Hivatap Officer and Taluka Medical Officer of Pachora was detained by corruption department team jalgaon bribe crime  esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime : आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता डॉ. लांडेंनी मागितली लाच; धुळे एसीबीची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Bribe Crime : आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता येथील तक्रारदाराचे घर व जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या जिल्हा हिवताप अधिकारी तथा पाचोरा येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे यांना धुळे येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल केला.

प्राप्त माहितीनुसार डॉ.लांडे हे स्वेच्छानिवृत्ती घेणार होते. मात्र, त्यापूर्वीच ही कारवाई झाली. (District Hivatap Officer and Taluka Medical Officer of Pachora was detained by corruption department team jalgaon bribe crime )

तालुक्यात शासनाच्या आरोग्य विभागातर्फे पाच आरोग्यवर्धिनी केंद्र मंजूर झाले आहेत. यासाठी येथील तक्रारदाराने त्याचे घर व जागा आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता आरोग्य विभागाला भाडेतत्त्वावर देण्यासाठी डॉ. लांडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी त्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी केली.

संबंधित तक्रारदाराने डॉ. लांडे यांच्यासोबतचे भ्रमणध्वनीवरुन झालेले बोलणे धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना ऐकवले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानुसार, या विभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांनी पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी, राजन कदम, शरद कटके, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, गायत्री पाटील, सुधीर मोरे यांच्या पथकासह चाळीसगावला येऊन चौकशी करून डॉ. लांडे यांच्या विरोधात लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT