District Milk Union Eknath Khadse Statement esakal
जळगाव

Eknath Khadse Statement : 10 ट्रक कागदपत्रे घेऊन जा, पण अगोदर गुन्हा नोंद करा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा दूध संघाने दाखल केलेल्या तक्ररीची अद्यापही नोंद केलेली नाही आणि जिल्हा दूध संघात तपास सुरू आहे. पोलिस नेमका कशाचा तपास करीत आहे, त्यांनी दहा ट्रक कागदपत्रे घेऊन जावीत; परंतु गुन्हा आगोदर नोंद करावा, याबाबत आम्ही न्यायालयात अवमान याचिकाही दाखल केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी दिली.

शहर पोलिसांकडून जिल्हा दूध संघाची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी संघात जाऊन काही कागदपत्रे ताब्यात घेतली. याबाबत माहिती देताना खडसे म्हणाले, की जिल्हा दूध संघात पोलिस पाच वर्षांच्या कागदपत्रांची तपासणी करीत आहेत.(District Milk Union Case Eknath Khadse Statement about police department Jalgaon News)

वास्तविक हा चोरीचा गुन्हा दाखल आहे, मग त्या अनुषंगाने त्यांनी केवळ स्टॉकची तपासणी करावी, त्यांना पाच वर्षांतील कागदपत्रे कशासाठी हवी आहेत. मात्र न्यायालयाने आदेश दिला आहे, की त्यांना कागदपत्रे हवी असल्यास त्यांनी प्रत्येक कागदाची झेरॉक्स करून त्यावर पोलिस ठाण्याचा शिक्का मारून त्याची पोच देऊन ती घेऊन जावीत. पोलिसांना आमची कागदपत्रे देण्यास कोणताही नकार नाही. परंतु त्यांनी प्रथम आम्ही दाखल केलेला चोरीचा गुन्हा दाखल करावा त्यानंतर आवश्‍यकता वाटल्यास दहा ट्रक कागदपत्रे घेऊन जावीत, असे मतही खडसे यांनी व्यक्त केले.

अवमान याचिका दाखल

न्यायालयाने जो आदेश दिला आहे, त्याप्रमाणे पोलिस कारवाई करीत नाहीत, असा आरोप करून आमदार खडसे म्हणाले, की त्यामुळे आम्ही पोलिसाविरुद्ध न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. सध्या न्यायालयाला दिवाळीची सुटी आहे. त्यानंतर आम्ही केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT