Ayushman Bharat Card esakal
जळगाव

ABHA Card : आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीत जळगाव जिल्हा तिसऱ्या स्थानी

सकाळ वृत्तसेवा

ABHA Card : वंचित घटकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने सुरू केलेल्या आयुष्यमान भारत कार्ड (गोल्डन) नोंदणी जळगाव जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.

जिल्ह्यात एकाच दिवसात दहा हजाराच्यावर लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून या नोंदणीत जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर पोचला आहे.(district ranks third in Ayushman Bharat Card registration jalgaon news)

देशात आयुष्यमान भारत कार्ड मोहीम राबविण्यात येत आहे. देशातील गरीब जनता व शेवटच्या घटकापर्यंत आरोग्याच्या सेवा प्रभावीपणे पोचण्यासाठी उपक्रम राबवला जात आहे.

या उपक्रमात अधिक लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सांगितले.

ग्रामीण भागात जोरदार मोहीम

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा मोठ्याप्रमाणावर कामाला लागली आहे. सध्या राज्यभर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीचे अभियान राबवण्यात येत आहे.

मोहिमेत जिल्हा परिषद अंतर्गतच्या ग्रामपंचायत विभागासह इतर विभागांनी सहभाग घेतला आहे. मंगळवारी (ता. ३१) जिल्ह्यात दहा हजार २९५ लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT