narega esakal
जळगाव

Jalgaon : जिल्ह्यात ‘नरेगा’ कामांमध्ये गडबड

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात नरेगाची कामे सुरू आहेत. मात्र या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी यंत्रणांची आहे. नरेगांतर्गत बहुतांश ठिकाणी खूप गडबडी असल्याचा संशय ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (ता. २६) बैठकीत व्यक्त केला. दरम्यान, अधिकाऱ्यांनी जबाबदारी ओळखून पुढच्या काळात कामे करावीत, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील नरेगांतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी ग्रामविकासमंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनात बैठक झाली. या वेळी खासदार उन्मेश पाटील, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, रोहयो उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांच्यासह अधिकारी उपस्थित होते (Disturbance in NREGA works in the district jalgaon News)

मंत्री महाजन म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्ध भारताचे स्वप्न पाहिले आहे. ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. त्यासाठी ग्रामीण भागाचा सर्वंकष विकास साधावा लागणार आहे. सध्याच्या काळात शहरे गजबजली आहेत, गावे मात्र ओस पडली आहेत. गावाकडे बघण्याची नकारात्मकता बदलायला हवी. शेवटच्या माणसाच्या जीवनमानात बदल घडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नरेगांतर्गत सिंचन विहिरी, शेततळे, शोषखड्डे यांसारख्या योजना आहेत. त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे.

हागणदारीमुक्ती योजनेचा बोजवारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिला आहे. मात्र आजही खेड्यापाड्यांवर हागणदारीमुक्ती योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे खुद्द मंत्री महाजन यांनी सांगितले. शौचालयासाठी अनुदान दिले गेले. मात्र या शौचालयांना स्टोअररूमचे स्वरूप आले असून, आजही अनेक जण उघड्यावर प्रातर्विधीसाठी जातात. आता यापुढे अशा व्यक्तींना गुलाबाचा पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी केली जाईल.

रोहयो उपजिल्हाधिकारी मते यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

Pratibha Dhanorkar Statement : ‘’मला ‘व्हिलन’ ठरवण्यामागे कुणाचं षडयंत्र, लवकरच भांडाफोड करणार'' ; प्रतिभा धानोरकरांचा सूचक इशारा!

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंग IN, तिलक वर्मा OUT? वेस्ट इंडिजविरुद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात भारताच्या Playing XI मध्ये बदल

Latest Marathi News Live Update: भूमरेंच्या चालकाकडून अंबादास दानवेंवर एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा

Mumbai: आधी पाठलाग, सेल्फीसाठी १५ मिनिटे त्रास अन्...; मुंबईत विदेशी महिला पर्यटकासोबत नको ते कृत्य, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT