Diwali Special News  esakal
जळगाव

Diwali Special : दिवाळी किटचे 6 लाख लाभार्थ्यांना वाटप सुरू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्य शासनाने रेशन दुकानामार्फत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो हरभराडाळ, एक लिटर पामतेल या चार शिधाजिन्नसांचा संच (दिवाळी किट) शंभर रुपयांत शासनाकडून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना दिवाळ संचाचे वाटप सुरू झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिली.(Diwali Special Distribution of Diwali kits to 6 lakh beneficiaries started Jalgaon News)

जळगाव जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या सहा लाख २० हजार ६५० शिधापत्रिकांसाठी या निर्णयाचा लाभ होणार आहे. या शिधाजिन्नसांचा पुरवठा झाल्यावर लगेच रास्त भाव दुकानदारांपर्यंत संच पाठविण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना जोडून दिलेल्या रास्त भाव दुकानात दिवाळीपूर्वी जाऊन ई-पॉस मशिनवर आपला अंगठा प्रमाणित करून शिधाजिन्नस संच प्राप्त करून घ्यावे.

रास्त भाव दुकानदाराकडून शिधाजिन्न संच घेतल्याची पावती घेऊन संचात चार पाकिटे असल्याची खात्री करावी. जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी दिवाळी शिधाजिन्नस संचाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मित्तल यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CID फेम इन्स्पेक्टर ताशा घरगुती हिंसेची शिकार; सोशल व्हिडीओ पोस्ट शेअर करत मागितलेली मदत

Hingoli Banana Farmer : पैसे तर गेलेच, मेहनतीचा घामही वाया! केळीच्या लागवडीवर खर्च केला अडीच लाख, उत्पन्न निघाले ५५ हजारांचे...

बापरे! 5G विसरा, 6G ची स्पीड बघून डोक्याला हात लावाल, 'या' देशाने केली टेस्टिंग, इंटरनेट स्पीडचे सर्व रेकॉर्ड मोडले

Fact Check : अजित आगरकरची दादागिरी आता बस झाली... रवी शास्त्री बनणार निवड समितीचे अध्यक्ष? X पोस्ट व्हायरल

Shashikant Shinde: महायुती सरकारवर जनतेचा रोष: प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; सरकारकडून मदतीच्या नावाखाली तोंडाला पाने पुसण्याचे काम

SCROLL FOR NEXT