While donating blood at Devaziri, Dr. Anand Rathore  esakal
जळगाव

Jalgaon News : रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टरांनीच केले रक्तदान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News  : रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी कोणतेही डॉक्टर्स शर्थीचे प्रयत्न करतात, अशी अनेक उदाहरणे आहेत.

परंतु ज्यांना ‘डॉक्टर’ हा शब्द देखील व्यवस्थित उच्चारता येत नाही, अशा आदिवासी रुग्ण महिलेचे प्राण वाचविण्यासाठी स्वतः एका डॉक्टरांनीच रक्तदान केल्याने डॉक्टरांच्या या रुग्णसेवेचे कौतुक होत आहे. (doctor himself donated blood to save patient life jalgaon news)

मानवतेला अधिक उंचीवर नेणारा हा प्रसंग सातपुड्यासारख्या देवगड या आदिवासी दुर्गम भागात घडून आला आहे. चोपडा तालुक्यातील वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत देवझिरी येथे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रात २४ वर्षीय चार महिन्यांची गरोदर महिला आली होती. तिला रक्तक्षय झाल्याने अशक्त अवस्थेतच तिला डॉक्टरांनी दाखल करुन घेतले.

तपासणीअंती या महिलेच्या रक्तातील हिमोग्लोबीन केवळ ४.८ टक्क्यांवर असल्याचे दिसून आले. जे साधारणत: १०-११ टक्क्यांपर्यंत असावे लागते. त्यामुळे या महिलेला ‘बी पॉझिटिव्ह’ या रक्ताची नितांत गरज होती. मात्र, तिच्याकडे कोणीही रक्तदाता नसल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेजारी किंवा हितसंबंधातील कोणी रक्त देऊ शकेल, असेही कोणीच नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. हे पाहून तिच्यावर उपचार करणारे समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) डॉ. आनंद मोतीराम राठोड यांनी मानवतेच्या भावनेतून स्वत: रक्त देण्याचा निर्णय घेतला. क्षणभर तर डॉक्टरांच्या या निर्णयावर गरोदर महिलेच्या कुटुंबीयांचा विश्वासच बसला नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी डॉ. राठोड हे स्वत: देवझिरी येथून ३५ ते ४० किलोमीटरवर चोपडा येथे गेले. तेथे रक्तदान केल्यानंतर रक्ताच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या गेल्या. त्यानंतर दुपारी चारपर्यंत परत येऊन त्या महिलेला रक्त दिले गेले. महिलेच्या शरीरात रक्त गेल्यानंतर हिमोग्लोबीनमध्ये पुरेशी वाढ गर्भातील बाळालाही योग्य पोषण प्राप्त झाले.

डॉक्टरांच्या या रक्तदानामुळे महिला अशक्तपणापासून सावरली गेली. डॉ. आनंद राठोड यांनी प्रसंगावधान ओळखून केलेल्या या अद्वितीय रुग्णसेवेचे आदिवासी बांधवांसह वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा, प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT