Members of the Sapke family of Laxminagara performing worship of Goddess Lakshmi. 
जळगाव

Jalgaon News : डोहाळे जेवणाचा अनोखा कार्यक्रम; सपके कुटुंबाची गायीप्रति श्रद्धा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : खण-नारळाने ओटी भरत केलेले औक्षण...पेढे- जिलेबीचा नैवेद्य...भक्तिगीतांनी आध्यात्मिक बनलेला परिसर...अशा वातावरणात गो-मातेचे डोहाळे जेवण करुन लक्ष्मीनगरातील कुटुंबाने गायीप्रति श्रद्धा अन् स्नेहाचा आदर्श घालून दिलाय. या प्रेमाने लक्ष्मी गोमाताही धन्य पावली. (Dohale meal program of pregnant cow by family jalgaon news)

होय ! जळगावमधील लक्ष्मीनगर येथे गोमातेचा डोहाळे जेवण कार्यक्रम संगीत व भक्तिमय वातावरण आणि महिलांच्या उत्साहात साजरा करण्यात आला. लक्ष्मीनगरातील रहिवासी गोसेवक दगडू व गणेश सपके यांच्याकडे लक्ष्मी गायीचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला.

भक्तिगीतांचा साज

विठ्ठल-रखुमाई भजनी मंडळाच्यावतीने ज्योती नारखेडे व त्यांच्या सहकारी महिलांनी भजन, भक्तिगीते व गवळण सादर करत कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली. त्यांना उपस्थित महिला-पुरुषांनी ठेका धरत साथ दिली. त्यांनी गायीचे तसेच गोमूत्राचे महत्त्व व उपयुक्तता पटवून दिले.

महिलेप्रमाणे डोहाळे जेवण

जयवंताबाई सपके, सुनंदा सपके, मनीषा सपके आदींनी गोमातेचे विधिवत औक्षण करून खणा-नारळाने ओटी भरून पूजन केले. स्थानिक व आजूबाजूच्या परिसरातून आलेल्या महिलांनी गो-मातेचे पूजन करून ओटी भरण्यासाठी गर्दी केली होती. गायीसमोर पेढे व जिलेबी ठेवण्यात आली. गायीने जिलेबीस तोंड लावताच महिलांनी एकच जल्लोष करत आनंद व्यक्त केला.

परीट समाजाचे कार्यकर्ते सुरेश ठाकरे यांनी सूत्रसंचालन व प्रास्ताविकात कार्यक्रम आयोजनाचे महत्त्व विशद करून गोसवक पिता- पुत्रांचे कौतुक केले. यावेळी माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी उपमहापौर आश्विन सोनवणे, नगरसेविका रेश्मा कुंदन काळे, सागर सपके, पंकज शिरसाळे, जयेश सोनवणे, जगन्नाथ जाधव, अरुण राऊत यांच्यासह परीट समाज कार्यकर्ते, परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होत्या. उपस्थित सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Rudali Tradition? : देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना 'रुदाली'ची उपमा; पण रुदाली म्हणजे कोण? काय आहे ही विचित्र परंपरा?

Thane News: शिवशाहीची धोकादायक अवस्था, व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग, अधिकाऱ्यांची सारवासारव

Adani Group Investment : दिवाळखोरीतून जाणाऱ्या ‘या’ कंपनीवर अदानी ग्रुप तब्बल १२५००००००००००० रुपये लावण्यास तयार!

Dhule News : धुळे जिल्हा बँकेचा 'कमाल': पीककर्ज वाटपात उद्दिष्ट ओलांडले, राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

SCROLL FOR NEXT