Mahakumbh News esakal
जळगाव

Jalgaon News : फैजपूरातील समरसता महाकुंभच्या पत्रिकांचे घरोघरी वाटप सुरु

सकाळ वृत्तसेवा

फैजपूर (ता. यावल) : महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निष्कलंकधाम वढोदा या ठिकाणी २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान समरसता महाकुंभचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अनेक संतांची उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाची रुपरेषाची व माहिती पत्रक वाटण्याचे काम स्वयंसेवक, सतपंथ महिला भजनी मंडळ करीत असून अनेक महिला शेतातील काम सोडून स्वयंस्फूर्तीने करताना दिसून येत आहे.(Door to door distribution of leaflets of Samarasata Mahakumbh started in Faizpur Jalgaon News)

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

कार्यक्रमाच्या सुमारे दोन लाख आमंत्रण पत्रिका तयार केल्या असून ६ डिसेंबरपासून त्याच्या वाटपाचे काम सुरू झाले आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळात भुसावळ, यावल, रावेर, चोपडा, अमळनेर, जळगाव, बऱ्हाणपूर आदी तालुक्यातील प्रत्येक गावातील घराघरांत ही कार्यक्रम पत्रिका दिली जात आहे.

त्यासाठी येथील सतपंथ महिला भजनी मंडळासह चिनावल, खडका, राजोरे, वढोदा, विटवा व निंबोल येथील भजनी मंडळाची सेवा लाभली आहे. मध्यप्रदेशासह गुजरातमध्येही भाविक भक्तगणांच्या माध्यमातून कार्यक्रम पत्रिकांचे वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन सतपंथ चारिटेबल ट्रस्टने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Payment: ऊस बिलासाठी महिलांनाही रस्त्यावर काढावी लागली रात्र; गोकुळ शुगरने १३० कोटी रुपये थकविले, २०० शेतकऱ्यांचा दोन दिवसांपासून ठिय्या

Mira Road: बकरी ईदच्या कुर्बानीला बकरा आणला, विरोध म्हणून हिंदुत्ववाद्यांनी डुक्कर आणलं; मिरा रोड परिसरात तणाव, VIDEO VIRAL

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार? काँग्रेस वापरणार भाजपचा 'बिहार पॅटर्न'

Latest Marathi News Live Update : चाकण बाजार समितीत कांदा उत्पादक आक्रमक

Shaktipeeth Highway Protest : ‘शक्तिपीठ’ महामार्गाविरोधात सर्वाधिक विरोध आजरा तालुक्यातून, शेतकऱ्यांनी एकत्र येत हरकती नोंदवल्या

SCROLL FOR NEXT