Double fare on Saturday and Sunday arbitrary management of luxury owners jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : शनिवारी, रविवारी दुप्पट भाडे! लक्झरीमालकांचा मनमानी कारभार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शनिवारी व रविवारी दररोज पेक्षा दुप्पट प्रवासी भाडे (fare) आकारणी, तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी व मालवातूकही केली जात आहे. लक्झरीचालक मनमानी कारभार करीत आहेत. (Double fare on Saturday and Sunday arbitrary management of luxury owners jalgaon news)

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वायूवेग पथक व महसूल सुरक्षा पथकाच्या अधिकाऱ्यांनी खासगी लक्झरी बसची तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी छावा मराठा युवा संघाने केली आहे.

याबाबत जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की जळगाव येथून नागपूर, मुंबई, पुणे आदी अनेक ठिकाणी स्लिपर कोच व खासगी बसने आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जाते.

खासगी प्रवासी बसच्या टपावरून मालाची वाहतूक केली जाते. मात्र, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वायूवेग पथक क्रमांक १ व २, तसेच महसूल सुरक्षा पथकामध्ये नेमणुकीस असलेले मोटार वाहन निरीक्षक खासगी लक्झरी बसची तपासणी करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

तपासणी पथकही निष्क्रिय

क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करून कारवाई करण्यासाठी एस. टी. महामंडळाने महसूल सुरक्षा पथकास स्वतःचे वाहन दिले आहे. या पथकात नेमणुकीस असलेल्या मोटार वाहन निरीक्षकांची तालुकानिहाय मासिक दौऱ्यासाठी (शिबिर) नेमणूक केल्याने ते स्वतः या पथकात नसतात.

या वाहनाचा वापर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना घेऊन ये-जा करण्यासाठी केला जातो, हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक एस.टी. महामंडळाचे वाहन आणि चालक, अधिकारी व इंधनाचा वापर होऊन वाहन तालुका शासकीय विश्रामगृहाच्या आवारात उभे असते.

किरकोळ स्वरूपाची कारवाई दाखविण्यासाठी म्हणून फक्त रिक्षाचालकांवर व इतर वाहनांवर कारवाई केली जाते, पण स्थानिक चालणाऱ्या खासगी लक्झरी बसवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे हे पथक पूर्णपणे निष्क्रिय ठरले आहे.

टपावरून अधिक मालवाहतूक होत आहे. शिवाय शनिवारी, रविवारी प्रवासी जास्त असल्याने दुप्पट भाडे आकारणी करून प्रवाशांची लूट केली जात आहे. जळगाव जिल्ह्यातील खासगी लक्झरी बसची कडक तपासणी करून उचित कारवाई करावी, अशी मागणीही छावा मराठा संघाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

SCROLL FOR NEXT