Dr Ritesh Patil esakal
जळगाव

Jalgaon News : आधी दिवाळ आदिवासी पाड्यांवर..मग घरचा उत्सव : डॉ. रितेश पाटील

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरापासून ५० किलोमीटर उत्तरेला सातपुडा पर्वताच्या दुर्गम पाड्यांवर सलग दहा वर्षांपासून समर्पित भावनेतून सेवा देणाऱ्या डॉ.रितेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी यंदाची दिवाळीही या आदिवासी कुटुंबीयांसेाबत साजरी केली.

दर वर्षाप्रमाणे आधी त्यांच्या पाड्यांवर दिवाळी त्यानंतर माझ्या घरी लावेल दिवा हा संकल्प करून चप्पल-बूट, कपडे, स्वेटर अन्‌ फराळासह चक्क नवी कोरी भांडी या आदिवासी बांधवांना वाटप करण्यात आली.(Dr Ritesh Patil statement of First Diwali on tribal area Jalgaon news )

दरवर्षीचा उपक्रम

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले आदिवासी पाडे आणि अतिदुर्गम भागापर्यंत दरवर्षी ही मदत पोहोचवली जाते. सातपुड्यातील पांढरी, कुंड्यापाणी, रामजीपाडा यांसह इतर गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीचा सण साजरा करण्यात आला.

डॉ. रितेश पाटील यांच्या पुढाकाराने शहरातील विविध क्षेत्रातील दानशूर संस्था, व्यक्तींकडून मिळणारे साहित्य संकलित करून त्याच संस्थांचे पदाधिकारी, समाजसेवकांच्या हस्ते गरजवंत गरजूंना यंदाही साहित्य वाटप करण्यात आले.

यांचे मोलाचे योगदान

दिवाळीचा सण असल्याने लहानग्यांसाठी नवीन कपडे, बूट-चप्पल, दप्तर, महिला वृद्धांसाठी कपडे, दिवाळीचा फराळ आणि नवीन भांडी असा जवळपास ट्रकभर साहित्य घेऊन सकाळीच गुजराथी महिला मंडळाच्या अध्यक्षा पोर्णिमा देसाई, प्रीती देाषी, भावना चौहान, बिंदीया जैन, चेतना दोषी, अमिषा डाबी, राखी कोठारी अशा महिला पदाधिकाऱ्यांसह डॉ. रितेश पाटील, जिल्‍हापरिषद सदस्य राकेश पाटील, प्रेमराज पाटील, किशोर सोनवणे यांनी आदिवासी पाड्यांवर साहित्य वाटप करून दिवाळी साजरा केली.

आधी त्यांची, मग आपली दिवाळी

''काहींना छंदातून आनंद मिळतो तर, काहींना सत्कार्यातून आणि खूप अशी कामे आहेत की, ज्याच्यातून समाधान मिळते. त्यातून आम्ही आदिवासी पाड्यांवर वस्तू, साहित्य वाटप करत दिवाळी साजरी करतोय.. जळगाव शहरातून अनेक दानशूर आणि प्रामाणिक लोक जुळले आहेत. गेली दहा वर्षे आम्ही हा उपक्रम राबवतोय.. आधी त्यांची, मग आपली दिवाळी साजरी करायची.''-डॉ. रितेश पाटील, हेामियोपॅथी तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT