Dr. Ulhas Patil Medical College and Hospital Missed life Treatment of youth sakal
जळगाव

आयुष्याची वाट चुकलेल्या तरुणावर उपचार सुरू

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयाचे दातृत्व

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : विचारांच्या गर्तेत अडकलेल्या... सिगारेट पीत दूरवर एकटक बघत बसणाऱ्या... मात्र, कुणाला कधीही त्रास न देणाऱ्या त्या व्यक्तीचे वाटसरूंना कुतूहल वाटे... एका उच्च पदावरील व्यक्तीनेही त्याला अनेक दिवस न्याहळले आणि त्याला माणसात आणण्याचे आवाहन स्वीकारत रुग्णालयात दाखल केले.

गर्भश्रीमंत पण आयुष्याची वाट चुकलेल्या तरुणावर सामाजिक बांधिलकीतून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाने उपचार सुरू केले आहेत.

मानसिक संतुलन गमावलेला हा तरुण डॉ. उल्हास पाटील यांच्या दृष्टिपथास पडला. डॉ. पाटील यांनी मानसोपचारतज्ज्ञांशी त्यांनी या तरुणाच्या अवस्थेबाबत चर्चा केली. या तज्ज्ञांनीही त्याच्यावर उपचार करून त्याला मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी स्वीकारली. या तरुणावर उपचार सुरू झाले असून, सकारात्मक प्रतिसादही मिळत आहे.

''रुग्णालयात व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात आले आहे. व्यसनामुळे वाट चुकलेल्या देशाचे भवितव्य असलेल्या भावी पिढीला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मानसोपचार विभाग करणार असून, तरुणांनी या कार्यास सहकार्य करावे.''

-डॉ. उल्हास पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT