Driver dies in car rickshaw accident jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon Accident News : कार-रिक्षा अपघातात चालकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : जळगाव-औरंगाबाद महामार्गावर उमाळा बसथांब्यासमोर कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने रिक्षास जबर धडक दिली. (Driver dies in car rickshaw accident jalgaon news)

या अपघातात रिक्षाचालक ठार झाला, तर प्रवासी जखमी झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अनोळखी चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

शहरापासून काही अंतरावर असलेल्या उमाळा गावाच्या बसथांब्यासमोर भरधाव येणाऱ्या कारने (एमएच ०२ बीआर ४३९१) प्रवासी रिक्षाला (एमएच १९ व्ही ३७६) जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालक राजू ओमप्रकाश साहू (वय ४५) जागीच ठार झाला, तर रिक्षातील प्रवासी जखमी झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. रिक्षाचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी अनोळखी कारचालकाविरोधात साहू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख अधिक तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''मुंबईला चाललो म्हणून निघाले अन् रात्रीतूनच दिल्लीला गेले'', धनंजय मुंडेंच्या दिल्लीवारीची इनसाईड स्टोरी

Viral Video Mother Dolphin : मन हेलावणारी घटना! मृत डॉल्फिनच्या पिल्लाला वाचवण्यासाठी आईची धडपड, व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Latest Marathi News Live Update : अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील - आमदार अमोल मिटकरी

Lucky Rashifal 2026: कन्या राशीसह 'या'3 राशीच्या लोकांसाठी आनंददायी असेल नवे वर्ष, सर्व इच्छा पूर्ण होतील

IPL 2026 लिलावात अनसोल्ड राहिला, पण पठ्ठ्याने धीर नाही गमावला! देशासाठी नाबाद १७८ धावांची खेळी, २५ चौकारांचा पाऊस

SCROLL FOR NEXT