Crops failing due to lack of rain in the district. esakal
जळगाव

Jalgaon Drought News : पावसाअभावी कोरडवाहू खरीप धोक्यात! कोरड्या दुष्काळाचे सावट

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Drought News : ऑगस्ट महिन्यातील सुरवातीचे चार व मध्यंतरीचे दोन दिवस सोडले, तर उर्वरित तब्बल २५ दिवस पावसाअभावी कोरड गेले आहेत. पाऊस नसल्याने पिकांची वाढ पुर्णत: खुंटली आहे.

९० टक्के कोरडवाहू कापूस एक फुटापर्यंतच वाढला आहे. उडीद, मुग, सोयाबीनचे ८० ते ९० टक्के नुकसानच आहे. धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. जमिनीतील पाणी पातळी खालावली आहे. एकंदरीत जिल्ह्याची वाटचाल दुष्काळाच्या दिशेने सुरू आहे. (Dry season kharif in danger due to lack of rain jalgaon Drought News)

जूनमध्ये पेरणीच्या काळात पाऊसच आला नाही. त्यामुळे जुलै महिन्यात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर काही दिवस सडा शिंपल्यागत आलेल्या पावसाने पिके जमिनीवर आली खरी; परंतु त्यानंतर गायब झालेला पाऊस व कडक तापत असलेल्या उन्हाने पीकं सुकत चालली असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र बघावयास मिळत आहे.

यावर्षी पावसाळ्याचे तीन महिने संपले. परंतु, जुलै महिना वगळता पावसाळी वातावरण वाटलेच नाही. ऑगस्ट, सप्टेंबरमध्येच ‘आक्टोबर हीट’ जाणवत आहे. आताचे तापमान ३३ ते ३५ अंशावर पोचले असून, पावसाचीही चिन्हे नाहीत.

अलनिनोचा प्रभाव

ज्यांच्याकडे बागायती शेती आहे, अशांची कपाशीचे पिक मात्र उंच वाढले आहे. पाण्याची सोय असल्याने ते ठिबकाद्वारे कपाशीला पाणी देत आहेत. मात्र ९० टक्के शेतकऱ्यांकडे कोरडवाहू जमीन आहे. त्यांचे कपाशीचे पिक एक फुटभर वाढले आहे. उडीद मुग, सोयाबीन पिके पावसाअभावी कोमेजू लागली आहेत. अलनिनोच्या प्रभावामुळे यंदाच्या खरीप हंगामावर विपरीत परिणाम झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वरिष्ठांकडे अहवाल

पाऊस नसल्याने पिकांबाबत कृषी विभागाकडून दर आठवड्याला वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठविला जात आहे. वरिष्ठ कार्यालयानेही नोंद घ्यावी, तसेच पीक नुकसानीची दखल घेऊन कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

"शासनाने तत्काळ सर्व्हे करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा. पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करावी व शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमाफी द्यावी." -किशोर चौधरी, शेतकरी, असोदा

धरणात समाधानकारक साठा

आतापर्यंत झालेल्या पावसामुळे मोठ्या धरणात समाधानकारक जलसाठा आहे. नदीपात्रातील विसर्ग पूर्णत: बंद करण्यात आला आहे. काही मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. मात्र अग्नावती, हिवरा बहुळा, मन्याड या मध्यम प्रकल्पांत शुन्य टक्के जलसाठा आहे. पालिका, महापालिकांना पाणी पुरवठ्याबाबत कडक धोरण अवलंबण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. यामुळे जिल्ह्यात ४ ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा नागरिकांना केला जात आहे.

मोठ्या धरणातील जलसाठा असा (टक्के)

हतनूर : ७०.४३

वाघूर : ५७.३०

गिरणा : ३६.८३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT