Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : अवाजवी वसुलीमुळे व्यापारी धडकले पालिकेत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील नगरपरिषद तथा ठेकेदारांकडून करण्यात येणारी वसुली अवाजवी असल्याने मीना बाजार, कटलरी व किरकोळ विक्रेत्यांनी कर प्रणालीचा निषेध म्हणून आपली दुकाने दोन दिवसांपासून बंद ठेवली होती. (Due to excessive recovery traders directly go to municipality for justice jalgaon news)

अकरा मेच्या रात्रीपासून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने अवाजवी कर आकारणीच्या विरोधात बंद केली होती. नदीपात्रात जागा मिळण्यासाठी पालिकेला भाडे भरावे लागते. मात्र पालिकेने ठेका दिल्याने ठेकेदार अवाजवी वसुली करत आहेत.

त्या पावतीवर नाव व शिक्का नाही. पैसे न दिल्यास मारहाण करू आणि माल जप्त करू., अशी धमकी दिली जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला.

फी कमी करत नाही, तोपर्यंत दुकाने बंद ठेवू, अशी भूमिका दुकानदारांनी घेतल्याने दोन दिवस महिलांना खरेदी करता आली नाही. पोलिस प्रशासनाने व्यापाऱ्यांची समजूत घातली. मुख्याधिकारी सरोदे यांनी लक्ष घालण्याची मागणी दुकानदारांनी केली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सर्व व्यापारी १३ मेस पालिकेत धडकले असता मुख्याधिकारी प्रशांत सरोदे अनुपस्थित असल्याने त्यांच्या वतीने प्रशासन अधिकारी संजय चौधरी व वसुली विभागाचे महेश जोशी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

पूर्वी ५० रुपये आमच्याकडून घेतले जायचे, आता १०० रुपये घ्या. मात्र अवाजवी वाढ करू नका, अशी मागणी सर्वांनी केली. यावर चौधरी यांनी मुख्याधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्याशी चर्चा काढून योग्य तो मार्ग काढू कुणाचेही नुकसान होणार नाही, याची ग्वाही दिल्यानंतर व्यापारी माघारी फिरले. या बंदमुळे यात्रेकरूंमध्ये नाराजीचा सूर दिसून आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wishes PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

Asia Cup 2025: पाकिस्तान संघाचा UAE विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार? खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

Latest Marathi News Updates : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोच्या भावात घसरण

Jalgaon News : जळगाव विमानसेवा ठप्प: अहमदाबाद विमान दीड महिन्यापासून बंद, प्रवाशांची गैरसोय!

Facial Surgery Success Story: "सुसाईड डिसीज"वर यशस्वी शस्त्रक्रिया - ठाण्यात दोन रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

SCROLL FOR NEXT