Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : घरपट्टी थकबाकीदार 42 जणांचे नळकनेक्शन बंद; महापालिकेची धडक कारवाई

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेने (Municipal Corporation) घरपट्टी वसुलीसाठी दंड व व्याजावर शंभर टक्के सूट देणारी अभय योजना सुरू केली आहे. (Due to non payment of taxes municipal corporation has raised bar of action tap connection of 42 defaulters has been closed jalgaon news)

तरीही काही जण कर भरत नसल्याने महापालिकेने कारवाईचा बडगाही उगारला आहे. थकबाकीदार ४२जणांचे नळकनेक्शन बुधवारी (ता. २२) बंद करण्यात आले.

शहरातील अनेक नागरिकांकडे वर्षांनुवर्ष घरपट्टी व पाणीपट्टी थकीत असून, वारंवार अभय योजना राबवूनही काही नागरिक घरपट्टी व पाणीपट्टी भरत नसल्याचे दिसून आहे. त्यामुळे महापालिकेच्या वसुलीत घट होत आहे. त्यामुळे आता महापालिकेने थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी महापालिकेने पथकेही तैनात केली आहेत. ज्यांच्याकडे जुनी व मोठ्या रकमेची घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी आहे, त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. प्रत्येक प्रभागात फिरून पथक कारवाई करीत आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

पथकाने तब्बल ४२ नागरिकांचे नळकनेक्शन बंद केले आहे. यात प्रभाग एकमध्ये सहा, तीनमधील आठ तर चारमधील नऊ नागरिकांचे नळकनेक्शन बंद करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आयुक्त गणेश चाटे, प्रभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही धडक कारवाई केली.

"नागरिकांनी थकबाकी भरण्यासाठी ‘अभय योजना’ सुरू केली आहे. तरीही काही नागरिक थकबाकी भरत नाहीत. त्यामुळे ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी कर भरून कारवाई टाळावी." -गणेश चाटे, उपायुक्त, महापालिका, जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT