Due to suspicion of character son killed mother jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चारित्र्याच्या संशयावरून मुलाने संपविले जन्मदात्रीला

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : वडली (ता. जळगाव) येथे सोमवारी (ता. २४) ४० वर्षीय महिलेस तिच्याच मुलाने लोखंडी सळईने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. जिल्‍हा रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी (ता. २८) रात्री बाराच्या सुमारास महिला मृत झाली. (Due to suspicion of character son killed mother jalgaon crime news)

अक्काबाई सुभाष भिल, असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या मृत्यूला जबाबदार असलेला तिचा मुलगा जितेंद्र भिल याला पोलिसांनी अटक केली आहे.

वडली (ता. जळगाव) येथे अक्काबाई मुले जितेंद्र आणि अजय भिल यांच्यासह वास्तव्यास होती. सोमवारी वडलीतील भिलवाड्यात लग्न असल्याने संपूर्ण वाडा लग्नात सहभागी झाला होता.

कुणीतरी आई अक्कबाईबाबत सांगितल्याने दोघेही भाऊ मामा अरुण भिल यांच्या घरी गेले व त्यांनी त्यांच्या आईची माहिती दिली. मामा अरुण याला घेऊन जितेंद्र व अजय रात्री पावणेअकराला अंबर करणसिंग भिल याच्या घरी धडकले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

दार उघडताच नको तेच घडले

तिघांनी अंबर करणसिंग याच्या घराचे दार उघडले. आत शिरताच अक्काबाई नको त्या अवस्थेत अंबर व त्याचा साथीदार सुकलाल दामू भिल यांच्यासह सापडून आली. जितेंद्र भिल याने लोखंडी सळईने आईवर हल्ला चढविला. गंभीर जखमी अक्काबाई बेशुद्ध पडली, तर अंबर व सुकलाल यांनी घरातून धूम ठोकली.

अक्काबाई बेशुद्ध पडल्यावर अरुण भिल यांनी घडलेला प्रकार पोलिसपाटील दिलीप पाटील व सरपंच युवराज गायकवाड यांना कळविला. तत्काळ रुग्णवाहिकेतून जखमी अक्काबाईला जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार दिवसांपासून उपचार सुरू असताना, शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास अक्काबाईचा मृत्यू झाला.

याबाबत मृत अक्काबाई भिल हिचा भाऊ अरुण भिल (वय ३६, रा. वडली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून, संशयित जितेंद्र भिल यास पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT