Cotton bolls lying on the ground in fields due to stormy, unseasonal rains. 
जळगाव

Jalgaon Unseasonal Rain: अवकाळीमुळे पांढरे सोने जमिनदोस्त; पारोळा तालुक्यातील चित्र

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Unseasonal Rain: यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे नगदी पीक असलेल्या कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यात कपाशीला भाव नाही. अशातच रविवारी (ता. २६) झालेल्या अवकाळी पावसामुळे होती नव्हती ती कपाशी अक्षरशः जमिनदोस्त झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर जणू अस्मानी संकटच कोसळले आहे.

यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी उभ्या कापसाच्या पिकावर ‘रोटाव्हेटर’ फिरवून रब्बी हंगामातील गहू, हरभरा व मका पीक घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रविवारी (ता. २६) वादळी व अवकाळी पावसामुळे शेतात उभे असलेले कापसाचे पांढरे बोंड जमिनीवर पडल्याने रब्बी हंगाम पाण्यात गेला आहे. (Due to unseasonal rains cotton fields were destroyed jalgaon news)

हवामान खात्याचा अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्रात वादळी व अवकाळी पाऊस होण्याचे संकेत देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. २६) तालुक्यातील जुन्या पाच मंडळातील पारोळ्यात १९ मिलीमीटरर, तामसवाडी २५, शेवाळे १५, बहादरपूर ११ तर चोरवड मंडळात ३६ मिलीमीटरर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. संपूर्ण तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

मोहाडी- दहिगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब आडवे झाले आहेत. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा बराच वेळ खंडीत होता. सद्यःस्थितीत तालुक्यात कापूस वेचणीसह रब्बी हंगामाच्या मशागतीला सुरुवात झालेली असताना हे संकट कोसळल्याने होत्याचे नव्हते झाले आहे. अवकाळी पावसामुळे जो काही कापूस ओला झाला आहे, तो सुकवण्यासाठी शेतकरी उन्हाची प्रतीक्षा करीत आहे.

आठवडे बाजारावर परिणाम

शहराचा दर रविवारी आठवडे बाजार असतो. या बाजारात तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरीक भाजीपाला, धान्य, किराणा व संसारोपयोगी वस्तू घेण्यासाठी येतात. खास बाजारासाठी इतर तालुक्यातील विक्रेते आपल्या वस्तू विक्रीसाठी आणतात.

या बाजारात सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास वादळी व अवकाळी पाऊस झाल्याने संपूर्ण बाजारात व्यापारी व खरेदीदारांची एकच धांदल उडाली होती. त्यामुळे सायंकाळनंतर गिऱ्हाईकीवर विपरित परिणाम झाल्याचे दिसून आले. वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालेला असला तरी विजेच्या लपंडावामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT