eknath khadse & eknath shinde
eknath khadse & eknath shinde esakal
जळगाव

एका नाथाच्या बंडाने दुसऱ्या नाथाच्या स्वप्नांवर फिरले पाणी

सकाळ वृत्तसेवा

भडगाव (जि. जळगाव) : माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath khadse) भाजपातून (BJP) राष्ट्रवादीत (NCP) दाखल झाल्यानंतर मोठ्या संघर्षातून ते नुकतेच विधानपरिषदेतून (Legislative council) आमदार (MLA) झाले. त्यामुळे ते पुन्हा मंत्री होणार असे आखाडे बांधले जात असतानाच दुसऱ्या एकनाथाने म्हणजेच सेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाथाभाऊंचा मंत्रिपदाचा पुन्हा अपेक्षा भंग केला आहे. त्यामुळे एका एकनाथाची मुख्यमंत्रिपदी लॉटरी लागली असताना दुसऱ्या एकनाथांच्या स्वप्नावर नांगर फिरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. (eknath khadse dreams shattered after eknath shinde become chief minister of state Jalgaon political News)

भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसेंना बऱ्याच कालावधीपासून राजकीय ग्रहण लागले होते. राष्ट्रवादीने त्यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्याच्या यादीत समाविष्ट केले होते, मात्र राज्यपालांनी दीड वर्षापासून त्यावर निर्णयच घेतला नाही. त्यामुळे त्यांना आमदार होता आले नाही. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ खडसेना राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेची उमेदवारी देत आमदार म्हणून निवडून आणले.

एकाच्या स्वप्नांना ‘पंख’ अन् दुसऱ्याला ‘सुरुंग’

माजी मंत्री एकनाथ खडसे विधानपरिषदेत आमदार झाल्यानंतर ते नक्की मंत्री होतील. अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. अर्थात राष्ट्रवादीनेही त्यांना मंत्रिपद दिले असते. त्यात त्यांना गृहमंत्री सारखे महत्वाचे मंत्रिपद मिळू शकते, असा कयास बांधला जात होता. कारण अनिल देशमुखांमुळे गृहमंत्रिपद रिक्त होते. मात्र ज्या दिवशी ते आमदार म्हणून निवडून आले त्याच दिवशी ते त्यांच्या स्वप्नांना ग्रहण लागले. त्याच रात्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह बंड पुकारले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले व सोबत खडसे यांच्या मंत्रिपदाच्या शक्यतांनाही पूर्णविराम लागला.

विरोधी पक्षनेतेपदाची दावेदारी

एकनाथ खडसे बदलल्या राजकीय समीकरणामुळे मंत्री होऊ शकणार नाही, अशी सध्याची राजकीय परिस्थिती असली तरी विधानपरिषदेत नाथाभाऊ राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण विधानपरिषदेत राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये खडसे हेच सिनिअर नेते असणार आहेत. त्यामुळे एका बाजूकडून नाथाभाऊंचा सत्तेचा लालदिवा गेला असला तरी दुसऱ्या बाजून त्यांना विरोधी पक्षनेता हे महत्वाचे पद मिळू शकते. त्यांनी यापूर्वीही विधानसभेत भाजपाचे विरोधी पक्षनेते म्हणून कारकीर्द गाजवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT