Eknath Khadse Latest News esakal
जळगाव

Eknath Khadse Statement : ऐनकेन प्रकारे गुन्ह्यात अडकवून अटक करण्याचे षडयंत्र

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात आपण एकमेव विरोधक आहोत, त्यामुळे विरोध संपवून टाकण्यासाठी गुन्ह्यात अडकवून आपल्याला ऐनकेन प्रकारे अटक करण्याचे षडयंत्र सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना सांगितले.

जिल्हा दूध संघातील लोणी व दूध भुकटी चोरीप्रकरणी संघाच्या चेअरमन व कार्यकारी संचालक यांनी दिलेल्या लेखी तक्रार प्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आमदार एकनाथ खडसे यांनी पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन केले. कोणाचा तरी दबाव असल्याने हा गुन्हा दाखल करण्यात येत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.(Eknath Khadse secret Blast Efforts to end opposition in district Jalgaon News)

याच दबावातून आपल्याला कोणत्याही गुन्ह्यात अडकवून अटक करण्याचे षडयंत्र सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळाली आहे. जामनेर येथील रहिवासी असलेल्या ‘एलसीबी‘च्या पोलिसाच्या माध्यमातून षडयंत्र रचण्यात येत असून, त्यांची जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी चर्चाही झाली असल्याची माहिती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी शनिवारी (ता. १५) घेतलेल्या पत्रकार परिषदेतही खडसे यांना कारागृहात जावे लागणार आहे, असा आपल्याबाबत उल्लेख केला होता. त्यामुळे त्याच अनुषंगाने हे षडयंत्र असावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. याबाबत आपण माहिती घेण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांना फोन लावला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, असेही आमदार खडसे यांनी सांगितले. आपल्याला अटक करून जिल्ह्यातील राजकीय विरोध संपविण्याची ही खेळी असल्याचे मतही खडसे यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: हजारो कोटींचा खर्च, सरकार बदललं, प्रकल्प आले... तरीही प्रत्येक पावसात मुंबई पाण्याखाली का जाते? नेमकं चुकतंय कुठे? जाणून घ्या...

Organic farming: सेंद्रिय शेतीचा चमत्कार! वेल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्याच्या झाडाला तब्बल १९ किलोचा फणस; डोंगररानात सेंद्रिय शेतीची झेप..

Crime News: दोन महिन्यांआधी प्रेमविवाह; सासरी येताच नवविवाहित तरुणी १४ वर्षीय दिरासोबत पळाली, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Atrocities Act: ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा: मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, अधिक गुन्ह्यांच्या जिल्ह्यांत जलदगती न्यायालये उभारा

Gujarat ATS: गुजरातमध्ये जैशचा कट उधळला! एटीएसकडून आठ संशयित दहशतवाद्यांना अटक; मॉड्यूल उभारण्याचा संशय

SCROLL FOR NEXT