Eknath Khadse
Eknath Khadse esakal
जळगाव

कार्यकर्त्यांनो, जनतेच्या प्रश्‍नावर रस्त्यावर उतरा! : Eknath Khadse

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडेच पाहिले जाते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता जनतेच्या प्रश्‍नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करावा व विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केले. जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात सोमवारी (ता. १०) आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. (eknath khadse statement on solving questions of public jalgaon news)

या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा वंदना चौधरी, महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील, राजेश पाटील, रवींद्र नाना पाटील आदी उपस्थित होते. या वेळी तालुकानिहाय पक्ष सदस्यत्वाचा आढावा घेण्यात आला, तर प्रा. सुनील नेवे यांनी सोशल मीडिया विषयावर मार्गदर्शन केले.

या वेळी बोलताना श्री. खडसे म्हणाले, की आजच्या स्थितीत शिवसेना दुभंगली आहे, भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जनतेचे प्रश्‍न घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे. कार्यकर्ते किती आहेत, त्यापेक्षा रस्त्यावर किती उतरतात याला अधिक महत्त्व आहे.

कार्यकर्त्यांच्या बळावरच आगामी निवडणुकांत आपण यशस्वी होणार आहोत. कार्यकर्त्याने सोशल मीडियावर अधिक तत्पर असले पाहिजे, आपल्या नेत्यावर कुणी टीका केली तर त्याच्याविरुद्ध सोशल मीडियावर तुटून पडले पाहिजे, त्याला ट्रोल करून त्रस्त केले पाहिजे यामुळे आपली भूमिका जनतेपर्यंतही पोचेल आणि जनतेत पक्षाची विश्‍वासार्हताही वाढेल.

युवक, महिला कार्यकर्त्यांनीही सतर्क असले पाहिजे, प्रत्येकाने किमान दहा कार्यकर्ते पक्षासोबत जोडले पाहिजेत, असे अवाहनही त्यांनी केले. तालुकाध्यक्ष सक्रिय असला पाहिजे, त्याने प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला पाहिजे. त्यातून पक्ष वाढीस मदत होईल.

व्यक्तिगत दुश्मनी काढण्याचे सध्याचे राजकारण : खडसे

राज्यातील सध्याच्या राजकारणावर पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले, की सध्याचे राजकारण अत्यंत वेगळ्या वळणावर आहे. व्यक्तिगत हेवेदावे आणि दुश्मनी काढण्यात येत आहे. राज्यात दोघांच्या भांडणात शिवसेना दुभंगली आहे. शिवसेनेत पडलेली फूट ही राज्याच्या हिताची नाही.

त्यामुळे राज्याच्या विकासावर परिणाम होईल. राज्यातील पक्ष असे आपसात भांडत राहिले तर यातून भारतीय जनता पक्ष मजबूत होण्यास संधी मिळेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. राज्यात विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. ‘वेंदात’ प्रकल्पासाठी सर्व पक्ष एक झाले असते, तर आज तो प्रकल्प राज्याबाहेर गेला नसता, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT