crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : माती टाकण्यावरून वृद्धासह मुलाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : सुजदे (ता.जळगाव) गावात घरासमोर माती टाकल्याच्या कारणावरून एका वृद्धासह मुलाला तीन जणांनी शिवीगाळ करत दगडाने हल्ला चढवून मारहाण करत दुखापत केल्याची घटना घडली.

जळगाव तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Elderly and child beaten for throwing soil jalgaon crime news)

सुजदे येथील पंढरीनाथ लहान सोनवणे (वय ६०) हे ज्येष्ठ गृहस्थ कुटुंबीयांसह वास्तव्यास असून शेती कामे करतात. मंगळवारी (ता.१४) सकाळी ७ वाजता त्यांच्या गल्लीत राहणारा बाळू देवा सोनवणे याने त्यांच्या घरासमोर माती टाकली.

त्यावर पंढरीनाथ सोनवणे यांनी माती टाकू नको, असे सांगितले, याचा राग आल्याने बाळू देवा सोनवणे, गोपाळ बाळू सोनवणे आणि जिजाबाई बाळू सोनवणे या ठिकाणी पंढरीनाथ सोनवणे यांच्यावर दगडाने हल्ला चढवून दुखापत केली.

भांडण सोडवण्यासाठी आलेला मुलगा शशिकांत सोनवणे याला देखील चपटाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर वृद्धाने जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेवुन तक्रार दिली.

त्यानुसार संशयित आरोपी बाळू सोनवणे, गोपाळ सोनवणे आणि जिजाबाई सोनवणे अशा तिघांविरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक नरेंद्र पाटील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT