Death News esakal
जळगाव

Jalgaon Accident News : बोदवड येथे ट्रकच्या धडकेत वृद्ध पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : शहरातील मलकापूर चौफुलीवर भरधाव आयशर ट्रकच्या धडकेत पायी जाणाऱ्या ८६ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला.

गंगाराम जगदेव पाटील (रा. कुंभारवाडा, बोदवड) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ही घटना शुक्रवारी (ता. १) सकाळी दहाच्या सुमारास घडली. ( elderly person died on spot after accident with truck in Bodwad jalgaon news)

जामनेरकडून मलकापूरकडे जाणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने (क्रमांक एमएच ४६, बीएफ ६१३२) पायी चालत असलेले गंगाराम पाटील यांना जोरदार धडक दिली. या अपघातात पाटील यांच्या डोक्याला, हाता-पायाला जबर मार लागून ते जागेवरच मृत झाले.

याबाबत सुरेश गंगाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित अब्दुल वाहिद राजुद्दीन (रा. मुंबई) याच्याविरुद्ध बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितासह ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मृत गंगाराम पाटील यांचे बोदवड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेद करून त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अतिक्रमणामुळे अपघातांच्या घटना

येथील मलकापूर चौफुली व जामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात एमएसआरडीकडून रस्त्याचे काम दीड वर्षांपासून सुरू आहे. रस्त्याची एक बाजू तयार झाली असून, या ठिकाणी व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे पायी चालणेही कठीण झाले आहे. अतिक्रमित व्यावसायिकांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते.

त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी किरकोळ व गंभीर अपघात नेहमी होत असतात. पांडुरंगाचे निस्सीम भक्त असणारे अनेक वेळा पायी वारी करणारे वारकरी व गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य असणारे गंगाराम पाटील हे याच अतिक्रमणाचा बळी ठरले आहेत. या अपघातानंतर तरी येथील अतिक्रमण काढून रस्ते करावे, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT