Panchayat Samiti Office esakal
जळगाव

पंचायत समितीत शुकशुकाट; वेळ संपण्यापूर्वीच निघून जातात कर्मचारी

पंचायत समितीतील विविध कार्यालयात सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास शुकशुकाट दिसून आला.

सकाळ वृत्तसेवा

रावेर (जि. जळगाव) : येथील पंचायत समितीतील विविध कार्यालयात सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास शुकशुकाट दिसून आला. रोजगार हमी योजना, शिक्षण, पाणीटंचाई, स्वच्छ भारत मिशन आणि पशु विकास अधिकारी यांच्या कार्यालयाला तर कुलूप लावलेले आढळून आले.

येथील पंचायत समितीतील पशुसंवर्धन विभागात दोन अधिकारी होते. तर कृषी, समाजकल्याण विभाग उघडा असून पंखे आणि दिवे सुरू असताना एकही कर्मचारी किंवा अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हता. बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात दोन महिला व पुरुष कर्मचारी उपस्थित होता. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला देखील कुलूप लावलेले होते. प्रशासन विभागही अर्धा रिकामा झालेला होता. रेल्वे गाडीच्या वेळेनुसार येथील कर्मचारी कार्यालयात उपस्थिती देत असल्याचे निदर्शनास येत आहे. येथील गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांच्याकडे रावेर व मुक्ताईनगर अशा दोन्ही ठिकाणचा पदभार असल्याने त्यांची पाठ वळताच अधिकारी आणि कर्मचारी दांडी मारून विविध कारणे सांगून कार्यालयातून निघून जातात. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पाच दिवसांचा आठवडा झाल्यापासून सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहापर्यंत कार्यालयाची वेळ असताना अप-डाऊन करणारे अधिकारी आणि कर्मचारी वेळेआधीच आपल्या घरी निघून जात असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? विधानपरिषदेचा अर्ज भरण्याची शक्यता

Kolhapur Ratnagiri Highway Delay : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग रखडला, पुलांची कामे थांबली; शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात कामांना मिळेना गती

Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक... हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स

Purandar Airport: पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी एकरी दीड कोटी रुपये मोबदला; सहा महिन्यांत भूसंपादनाचे काम पूर्ण करणार!

Pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाचं निरीक्षण; स्वतःहून नोकरी सोडल्यास...

SCROLL FOR NEXT