scholership scam esakal
जळगाव

जळगाव : अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती खात्यावर ‘डाका’

रईस शेख

जळगाव : खान्देश बहुउद्देशीय संस्था संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात (Engineering College) संस्थाध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी बँक खात्यात परस्पर फेरबदल करून शासनाकडून प्राप्त विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती (Scholarship Account) खात्यातून वेळेावेळी बेकायदेशीरपणे पैसे विड्रॉल (Withdrawal) करून ५ लाख ६१ हजारांचा अपहार केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (engineering students scholarship department Embezzlement of 5 lakh 61 thousand Jalgaon Crime News)

धरणगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात नमुद केल्याप्रमाणे, बांभोरी प्रचा (ता. धरणगाव) येथे खान्देश बहुउद्देशिय संस्था संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व टेक्नोलॉजी नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी, बंभोरी प्रचा (ता. धरणगाव) या महाविद्यालयाचे स्टेट बँकेच्या शिवकॉलनी स्टॉपवरील बँक शाखेत खाते क्र (34593779144) हे शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी प्राप्त होणाऱ्या शिष्यवृत्तीचे खाते आहे.

या खात्याचे संचलन संस्थाध्यक्ष, प्राचार्य आणि संस्थेतील उपाध्यक्ष अशा तीनपैकी कोणत्याही दोन व्यक्तीच्या स्वाक्षरीने व्यवहार करणे अपेक्षीत असताना, परस्पर संस्थाध्यक्षाचे पती तथा संचालक रतिलाल वना पाटील (वय ५६, रा. शिवकॉलनी), उपाध्यक्ष विलास दत्तात्रय नायर (वय ६०, रा. प्रभुदेसाईनगर) अशा दोघांनी संगनमत करुन संस्थात्मक पातळीवर (१२ मे, २०१८) स्वाक्षरी बदलासंदर्भात खोटा ठराव करुन त्याचे बनावट दस्तऐवज बँकेत सादर करुन विद्यार्थ्यांच्या शिष्यवृती खात्यातून वेळोवेळी ५ लाख ६१ हजार रुपये विड्रॉल करुन अपहार केल्याची तक्रार दस्तुरखुद्द तत्कालीन प्राचार्य सचिन भीमराव पाटील यांनी दिल्यावरून दोघा संशयितांविरुद्ध धरणगाव पोलिसांत शासनाची व बँकेची फसवणूक, अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक निरीक्षक जिभाऊ पाटील करत आहेत.

प्राचार्यांची न्यायालयात धाव

संस्थेचे प्राचार्य सचिन पाटील (वय ४२, रा. शिवकॉलनी) यांच्या मोबाईलवर आलेल्या संदेशावरून बँकेच्या खाते हाताळणाऱ्या व्यक्ती बदलल्याचे कळताच त्यांनी याबाबत अधिकृत माहिती संकलित केली. संबंधितांनी कुठलाही अधिकार नसताना, अध्यक्ष व उपाध्यक्षपदी खोटेपत्र मिळवून त्याद्वारे नियोजनबद्धरीत्या बोगस ठरावाच्या विनास्वाक्षरी, शिक्यांच्या प्रतिद्वारे खोटा अहवाल बँकेत सादर केल्याचे आढळून आल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

पोलिस चिडीचूप

प्राचार्य सचिन पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, पाळधी औटपोस्टला सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश बुवा यांना लेखी तक्रार देऊनही त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही. अखेर, न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्या. एस. डी. सावरकर यांच्या न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेशित केल्यावर धरणगाव पोलिसांत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खासदारकीसाठी TMC बंडखोरांनी निवडला त्रिपुरातला लहान पक्ष, फक्त नावाला अस्तित्वात; दोन वर्षांपूर्वी NCPIची स्थापना

Latest Marathi News Live Update : उन्हाळी सुटीनंतर राज्यातील ज्ञानमंदिरे आजपासून पुन्हा गजबजणार; चिमुकल्यांना पहिल्या दिवसाची उत्सुकता

Pune Ring Road: पुणे परिसरातील ११७ गावांसाठी मोठी बातमी! सरकारच्या निर्णयामुळे विकासाचा मार्ग मोकळा, रिंगरोडलाही मिळणार वेग

Nagpur: मांजर चावल्यानं तक्रारीला उशीर, विनयभंगाचा गुन्हा कोर्टानं केला रद्द; शाळेच्या अध्यक्षाला दिलासा

Ratnagiri Rain Update : कोकण किनारपट्टीवर कडकडीत ऊन! मुंबई वेधशाळेचा पुढील 3 दिवसांचा 'हा' अंदाज वाचून शेतकऱ्यांची धडधड वाढली, 2 हजार हेक्टरवरील पेरण्या संकटात

SCROLL FOR NEXT