After the arrival of the largest Ganesha idol in the city, Pooja and Mahaarti were performed by Mahamandaleshwar Jarnadan Maharaj. esakal
जळगाव

Ganeshotsav 2023 : फैजपूरला 86 मंडळांकडून श्रीगणेशाची स्थापना; बाप्पाच्या सव्वा किलो चांदीच्या चरणाचे अनावरण

सकाळ वृत्तसेवा

Ganeshotsav 2023 : विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनासाठी गणेश मंडळ, कार्यकर्ते यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. शहर व परिसरात सार्वजनिक व खासगी अशा एकूण ८६ मंडळांकडून गणपतीची स्थापना करण्यात आली.

शहरासह परिसरात सार्वजनिक ६६ व खासगी १४ मंडळे आहेत. यांपैकी कोसगाव, हंबर्डी, बोरखेडा बुद्रुक, बोरखेडा खुर्द, चिखली बुद्रुक, भोरटेक,अशा ६ गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला आहे. (Establishment of Shree Ganesha from 86 Mandals in Faizpur jalgaon news)

तर एकट्या फैजपूर शहरात २० ठिकाणी बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. तर न्हावी येथे १७, आमोदा येथे ४, भालोद ११, पाडळसे ८, बामणोद ९, विरोदा १ यासह फैजपूर पोलिस ठाणे हद्दीतील २८ गावात एकूण सार्वजनिक ६६ व खासगी १४ तर एक गाव एक गणपती सहा ठिकाणी गणरायाची स्थापना करण्यात आली आहे.

सार्वजनिक मंडळे, गणेश भक्तांमध्ये उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ, पोलिस उपनिरीक्षक मकसूद शेख, पोलिस उपनिरीक्षक मयनुद्दीन सय्यद, पोलिस उपनिरीक्षक मोहन लोखंडे, होमगार्ड समादेशक विकास कोल्हे, गोपनीय पोलिस विजय चौधरी, योगेश दुसाने यांच्यासह स्थानिक पोलिस कर्मचारी २५, जळगाव मुख्यालय ८, होमगार्ड ४५ असा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरासह फैजपूर पोलीस ठाणे हद्दीत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सव्वा किलो चांदीचे चरण

फैजपूर येथील आराधना गणेश मित्रमंडळाने (फैजपूरकरांचा चिंतामणी) फटाक्याच्या आतषबाजीत लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. शहरातील सर्वांत मोठ्या २१ फूट गणेशमूर्तीचे शहारातील सुभाष चौक येथे महामंडलेश्वर जर्नादन हरी महाराज यांच्या हस्ते पूजन व महाआरती करण्यात आली.

तसेच बाप्पाच्या सव्वा किलो चांदीच्या चरणाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष नीलेश राणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ, पवन सराफ, राजेश चौधरी, राकेश सराफ, केतन चौधरी, पुरुषोत्तम सराफ, हर्षल कोल्हे, नीलेश महाजन, दीपक सराफ यांच्यासह आराधना गणेश मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व कार्यकरणी सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT