Car Accident esakal
जळगाव

Jalgaon News : कार चारवेळा उलटूनही चालक सुखरूप बचावला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सुसाट कार अजिंठा चौकाकडून इच्छादेवीकडे जात असताना चारवेळा उलटून रस्त्याच्या कडेला खांब्यावर धडकली. या अपघातात कुणीही वाचेल, अशी परिस्थिती नसताना चालक मात्र सुखरूप बचावला.

अजिंठा चौकाकडून इच्छादेवी चौकाकडे जात असताना, रात्री अकराच्या सुमारास सुसाट कार महामार्गाच्या दुभाजकावर चाक चढल्याने उलटून चक्क चार वेळा उलटली व महामार्गाशेजारील झाडाला व नंतर खांब्यावर आदळून चक्काचूर झाली. (Even after the car overturned four times Driver escaped unharmed Jalgaon Accident News)

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

नंबर प्लेटसह संपूर्ण कारचा चुराडा झाला. साधरण दीडशे किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने येणाऱ्या कारचा अपघात झाल्यानंतर परिसरातील रहिवाशांचा काळजाचा ठोकाच चुकला. मदतीसाठी तरुणांनी कारच्या दिशेने धाव घेतली.

चालकाला कारबाहेर काढून रुग्णालयात नेण्यासाठी रिक्षात बसविले. जिल्‍हा रुग्णालयात आणले. मात्र, त्या तरुणाची अवस्था बघता डॉक्टरांनीही त्याला दाखल करून घेण्यास नकार दिला. कारण अंगात श्रीमंतीचा माज आणि दारूच्या नशेत तर्रर दिसेल त्याला लाखोली वाहत होता.

रिक्षा पूर्णतः वांत्यांनी चिंब करून पुन्हा अपघातस्थळावर घेऊन आले. घडल्या अपघाताची भीषणता इतकी होती की सकाळी अपघातग्रस्त कार बघण्यासाठी लोकांची गर्दी उसळली. मात्र अद्यापही याप्रकरणी पोलिसांत कुठलाच गुन्हा दाखल झालेला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatray Bharane : 'भोंदूबाबा-महाराज हे सगळं झूट, पोरांनो त्यांच्या नादाला अजिबात लागू नका'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सल्ला

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! सोनं-चांदी आणखी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

April 2026 Calendar: हनुमान जयंती, अक्षय तृतीया ते सीता नवमी; आंब्याच्या मोसमातील खास सण आणि महत्त्वाचे दिवस जाणून घ्या

सोनम कपूरच्या घरी आला गोड पाहुणा, अभिनेत्री झाली आई, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Satara ZP Controversy : मोठी बातमी! सातारा SP तुषार दोषींना 'सक्तीची रजा'; मंत्री शंभूराज देसाईंच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारची कारवाई

SCROLL FOR NEXT