Kishore Chaudhary, Shalini Chaudhary, Savita Chaudhary etc. felicitated poetess Bahinabai Chaudhary on her birth anniversary on Wednesday. esakal
जळगाव

Jalgaon : बहिणाबाई स्मारक पूर्णत्वाची शिंदे सरकारकडून अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : तब्बल १० वर्षांपासून निधीअभावी काट्याकुट्यांमध्ये अपूर्ण भग्नावस्थेत पडून असलेले कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक पूर्ण व्हावे, यासाठी नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारला बुधवारी (ता. २४) साकडे घालण्यात आले.

स्मारकासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून प्रश्न मांडण्याचा ठराव कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारक विकास समितीसह ग्रामस्थांनी केला. (Expectation from Shinde government for completion of Bahinabai chaudhary memorial Jalgaon latest marathi news)

स्मारकाचे काम ५० टक्के झाले आहे. तीन वर्षांपासून निधी नसल्याने काम बंद आहे. यामुळे स्मारकाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वारंवार आश्वसाने दिली जात आहेत, अशी माहिती स्मारक विकास समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी यांनी दिली. राज्यभरातून साहित्यिक, कवी, लेखक स्मारकाला भेट देतात.

बहिणाबाईंचे जुने घर, स्मारकाची दुरवस्था बघून दु:ख व्यक्त करतात. या जुन्या घराचे पुर्नेजीवन करावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. शालिनी चौधरी, सविता चौधरी यांनी प्रतिमेचे पूजन केले. रविकांत चौधरी, खेमचंद महाजन, संजीव पाटील यांनी पहार अर्पण केला. शरद नारखेडे, विनोद बारी, पोलिसपाटील आनंद बिऱ्हाडे, योगेश वाणी, धनराज कोल्हे आदी उपस्थित होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री घायवळ गँगचा धुमाकूळ; गोळीबारात एक जण गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

माेठी बातमी! 'शिरवळमध्ये भरदिवसा गाेळीबार'; घटना सीसीटीव्‍हीत कैद, तिघांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ, नेमकं काय घडलं..

Chh. Sambhajinagar Accident : माळीवाडा पुलावर भीषण अपघात, भरधाव कंटेनरखाली दुचाकीस्वाराचा जागीच मृत्य

सरकारचा मोठा निर्णय! आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ‘या’ लाखो लोकांचे जन्म-मृत्यू दाखले रद्द होणार आणि पोलिसांकडून दाखले जप्त होणार, नेमका आदेश काय?, वाचा...

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज स्वत: आशीर्वाद देताना... AI VIDEO व्हायरल, दर्शन चुकवू नका

SCROLL FOR NEXT