Colleges Admission News esakal
जळगाव

Jalgaon NMU Admission : एम.एस्सी, एम.ए. भूगोल प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon NMU Admission : मार्च, एप्रिल व मे महिन्यातील पदवी अभ्यासक्रमांच्या फेरतपासणी व पूनर्मुल्यांकनात उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही वरील पदव्युत्तर अभ्याक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करता येईल. (Extension of admission for postgraduate courses in NMU jalgaon news)

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक प्रशाळा व संलग्नित महाविद्यालयातील एम.एस्सी. (सर्व विषय), तसेच एम.ए. (भूगोल) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणे आणि एआरसी केंद्रावर कागदपत्रे पडताळणी करण्यास १२ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

विद्यापीठाकडून केंद्रीय पद्धतीने एम.एस्सी. (सर्व विषय), तसेच एम.ए.(भूगोल) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत ८ जुलैपर्यंत होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विद्यार्थ्यांची प्रवेशासंदर्भातील मागणी, तसेच विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमांचे फेरतपासणी व पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर केल्यामुळे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेशाची संधी त्यांना मिळावी, यासाठी १२ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा विद्यार्थी हिताचा हा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून त्यांचे गुणपत्रक डाऊनलोड करून त्याची प्रत अर्जासोबत अपलोड करावयाची आहे. तसेच एआरसी केंद्रांकडून ही प्रत ग्राह्य धरली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या वाढवून दिलेल्या मुदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT