Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime: ऑनलाईन मैत्री पडली महागात! लग्नाचे आमिष देत मुलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २५ वर्षीय तरुणीशी फेसबुकवर फ्रेंडशीप झाल्यानंतर तिच्यावर घरात घुसून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Facebook Friend Abuse of girl student missing who lures marriage Threatened to make photo viral Jalgaon Crime News)

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुटूंबियांसह वास्तव्यास असलेल्या २५ वर्षीय विद्यार्थिनीची ओळख फेसबुकवर इद्रिस खाटीक नावाच्या तरुणाशी झाली होती. डिसेंबर २०२२ मध्ये दोघांची भेटही झाली.

भामट्या इद्रिसने तिच्या घराचा शोध घेत ती घरात एकटी असताना शिरकाव केला. लग्नाचे आमीष देत या तरुणीशी सलगी करुन तिच्या ईच्छेविरुद्ध शरीरसंबध प्रस्थापीत केले.

दुसऱ्यांदाही तरुणी घरात एकटी असताना भामट्याने घरात येवुन मोबाईलमध्ये तिचे फोटो काढले. पिडीतेने लग्नाच्या बोलणीसाठी तगादा लावल्यावर संशयीताने टाळाटाळ करण्यास सुरवात केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे पिडीतेने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने संशयिताने तिचे फोटो सोशल मिडीयावर अपलोड करण्याची भिती दाखवुन वारंवार अत्याचार केले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर पिडीत तरूणीने पालकांना घडला प्रकार सांगितला.

पिडीतेच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक रुपाली महाजन यांनी जबाब नोंदवुन घेत संशयीत इंद्रीस खाटीक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT