crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : आंतरराष्ट्रीय घड्याळ कंपन्यांचा बनावट माल जप्त

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : आंतरराष्ट्रीय ब्रँड असलेल्या घड्याळांसह त्याचे बनावट सुटेभाग निर्मिती आणि विक्री करणाऱ्या फुले मार्केटमधील दुकानावर शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून १६ हजार ६४० रुपयांचा बनावट माल जप्त केला.

संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत दुकानमालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.( fake goods of international watch companies seized jalgaon crime news )

नवी दिल्लीतील एसएनजी सॉलिसिटर एलएलपी या लीगल फर्मला मिळालेल्या माहितीच्या आधारे गेल्या दोन दिवसांपासून कंपनीचे तज्ज्ञ आणि अधिकारी शहरातील विविध शोरुम्स आणि दुकानात तपासणी करत होते.

त्यांनी फुले मार्केटमधील दहा ते बारा दुकानांत माहिती संकलित केल्यावर बुधवारी (ता. १) तक्रार देऊन शहर पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. फुले मार्केटमधील एल पट्टा दुकानातील बाँबे फॅन्सी व न्यू अनिता वॉच ॲण्ड कंपनी दुकानात जाऊन पाहणी केली.

परंतु त्या ठिकाणाहून त्यांना काही मिळाले नाही. त्यानंतर त्याच परिसरातील आनंद टाइम सेंटर या ठिकाणी त्यांनी छापा टाकून तपासणी केली. त्याठिकाणी टायटन कंपनीच्या बनावट डायल केस व इतर सुटे भाग पथकाला मिळून आले.

जप्त सर्व माल आंतरराष्ट्रीय ब्रँड असलेल्या कंपन्यांची कॉपी असल्याचे प्रमाणपत्र पोलिसांना दिले. या प्रकरणी गौरव तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुकानमालक भारत चिमनदास तलरेजा (वय ६५, रा. शालिमार सोसायटी, गणपतीनगर) यांच्याविरुद्ध कॉपीराइट ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT