esakal
जळगाव

Jalgaon: पोटासाठी पाठीला फटके अन् चिमुरड्यांचे भविष्य धुसर; पोतराजांची कुटुंबे पश्चिम महाराष्ट्रातून खानदेशात

शंकर भामेरे

Jalgaon News : टिचभर पोटासाठी थंडी, पाऊस, उन्हातान्हाची पर्वा न करता पाठीला फटके मारत उपजीविका करणारे पोतराज भटकंती करत पश्चिम महाराष्ट्रातून खानदेशात आले आहेत. मात्र भटकंतीमुळे त्यांच्या चिमुकल्यांच्या शिक्षणात खंड पडत असल्याने त्यांचे भविष्य धूसर होत आहे. (families of Potrajas came from western Maharashtra to Khandesh jalgaon news)

पोतराज ही एक लोककला असून, शासनाने अशा लोककला जोपासण्यासाठी कलावंतांना स्थानिक परिसरातच हक्काचा रोजगार उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा -सांगली भागातून सुमारे १० कुटुंबं सध्या भटकंती करत खानदेशातील पहूर - शेंदुर्णी भागातील यात्रेनिमित्त आलेली आहेत.

पोतराज अंबाबाई देवीचे भक्त असून, देवीचे जागरण करत ते आपल्या पोटासाठी पाठीला चाबकाचे फटके मारतात. ढोलक वाजवत.

त्या आवाजाचा तालावर स्वतःचे दुःख विसरून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ते दारोदार हिंडून भिक्षा मागतात. मिळालेल्या दोन पैशातून स्वतःची उपजीविका भागवत गावोगाव भटकंती करतात.

रविवारी (ता. ३) पहूर येथे आठवडे बाजारात सांगलीहून आलेले पोतराजाचे कुटुंब चिमुकलीसह तीचा भाऊ चाबकाचे फटके मारून आपल्या कुटुंबाला सहाय्य करत होता. बाजारातील लोकांनी त्यांना दोन पैसे दिलेही, मात्र या चिमुकल्यांच्या शिक्षणात खंड पडल्याने त्यांचे भविष्य धुसर होत असल्याबद्दल शिक्षणप्रेमींनी चिंता व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT