crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : गावगाड्यात व्यस्त कुटुंबाचे घर फोडले; निवडणुकीचा प्रचार अन्‌ घरात चोरटे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीचा जोर वाढला आहे. पाथरी (ता. जळगाव) या आपल्या मूळ गावी कुटुंबीयांसह गेलेल्या पंडित तुळशीराम माळी (ह. मु. संभाजीनगर, जळगाव) यांच्या बंद घरातून चोरट्याने रोख ३० हजारांसह साडेनऊ तोळ्याचे दागिने चोरून नेले.

ही घटना शनिवार (ता.४) रोजी उघडकीस आली.(family go for Election campaign and thieves in house jalgaon crime news)

मूळ पाथरी येथील रहिवासी असलेले पंडित माळी हे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरीला आहे. त्यामुळे ते कुटुंबीयांसह जळगावातील संभाजीनगर परिसरात राहतात.

पाथरी ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने ते कुटुंबीयांसह गावी गेले होते. शुक्रवार (ता.३) रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. रोख ३० हजार रुपयांची रक्कम, साडेनऊ तोळ्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला.

शनिवारी माळी यांच्या पत्नी घरी आल्या त्यावेळी घटना समोर आली. त्यांनी पती पंडित माळी यांना घटनेची माहिती दिली.

त्यांनी घरी येऊन पाहणी केली व रामानंद नगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Megablock: दिवाळीतही मेगाब्लॉकची अडचण! लोकलसह अनेक गाड्यांवर परिणाम; प्रवाशांचा होणार खोळंबा

Gold Price on Dhanteras: धनत्रयोदशीच्या आधी सोनं 3,200 रुपयांनी महागलं; तर चांदी 7 हजारांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : अमरावतीत सोनेरी भोगची चर्चा! २४ कॅरेट वर्खाने सजलेली ₹21 हजार किलोची मिठाई आकर्षणाचे केंद्र

Hasan Mushrif : सासऱ्यांनी सुरू केलेल्या डिबेंचरविरोधात सुनेचा मोर्चा, ढोंगी माणसांना लोक ओळखून, हसन मुश्रीफांचा कोणावर रोख...

Minister Dattatreya Bharane: राज्यात रब्बी हंगाम क्षेत्रात होणार वाढ: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे; पाणी टंचाई जाणवणार नाही

SCROLL FOR NEXT