Child death
Child death esakal
जळगाव

Jalgaon News : मृत्यूनंतरही जग बघणार मुक्ताईनगरचा 10 वर्षीय ओम भारंबे!

सकाळ वृत्तसेवा

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : वॉल कंपाउंडचे वजनदार गेट उघडताना अचानक गेट तुटून दहा वर्षीय बालकाच्या अंगावर पडून तो गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. २८) सकाळी अकराच्या सुमारास मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयाशेजारी घडली होती. (family kept memory alive by donating eyes of 10 year old boy jalgaon news)

डॉ. जगदीश पाटील यांच्याकडे प्राथमिक उपचार करून जखमी मुलाला पुढील उपचारार्थ जळगावात हलविण्यात आले होते. गंभीर जखमी ओम प्रमोद भारंबेची मृत्यूशी झुंज सुरू होती. डॉक्टरही त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

परंतु ओमची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर बुधवारी (ता.२९) दुपारी चारला थांबली. त्याने अखेरचा श्वास घेतला. दरम्यान प्रचंड आघातातही मुलाचे वडील प्रमोद हरी भारंबे यांनी त्याचे डोळे दान देण्याचा निर्णय घेऊन आपल्या लाडक्या मुलाच्या स्मृती जिवंत ठेवल्या असून, संकटातही अवयव दानाची समय सूचकता ठेवून भारंबे कुटुंबीयांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT