agriculture land esakal
जळगाव

अतिक्रमणात अडकला शेतरस्ता; शेतकरी हवालदिल

शेतमाल कसा काढावा व शेतात कसे जावे, हा प्रश्न पडला आहे.

बापू शिंदे

तरवाडे (ता. चाळीसगाव) : येथील शिवारातील हक्काचा शेतरस्ता अतिक्रमणधारकांनी गिळंकृत केल्याने सुमारे वीस शेतकऱ्यांना शेतरस्ताच नसल्यामुळे दोन वर्षांपासून मोठे संकट ओढावले आहे. यासंदर्भात तहसीलदारांकडे तक्रारी अर्ज देऊनही न्याय न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतमाल कसा काढावा व शेतात कसे जावे, हा प्रश्न पडला आहे. (Latest Marathi News)

चाळीसगाव ते धुळे मार्गावरील सर्व रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद करून बोगदे तयार केल्याने रहिपुरी व वडगाव गेटचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वापराचा प्रश्न गंभीर झाला आहे. पूर्वी रेल्वेगेट ओलांडून रेल्वेच्या हद्दीतील जागेचा वापर करून सर्व शेतकरी आपापल्या शेतात बैलगाडी, ट्रॕक्टर घेऊन ये-जा करीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काच्या वहिवाटीच्या शिवरस्त्यांची गरज भासत नसे. त्याच संधीचा फायदा घेत शिवरस्त्यालगतच्या शेतकऱ्यानी या शिवरस्त्यावर अतिक्रमण करून अक्षरशः हा रस्ता गिळंकृत केला आहे. याकडे कोणीही लक्ष दिले नाही.

‘सरकारी काम कितीही वर्ष थांब’

मात्र आता गेल्या दोन वर्षापासून रेल्वे प्रशासनाने सर्व गेट बंद करून बोगदे तयार केले व रेल्वेच्या हद्दीतील होणारा अनधिकृत वापर बंद झाला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा हक्काचा शिवरस्ता होता, तो नष्ट झालेला दिसला व महसूल प्रशासनाचा दरवाजा ठोठावला असता तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता रेल्वेच्या ठेकेदारांनी त्यांच्या बोगद्याच्या कामासाठी रेल्वेहद्दीच्या शेजारील शेतकऱ्यांच्या खासगी शेतातून बोगद्याचे काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरता तयार रस्ता केला होता. त्यामुळे हाच रस्ता वापरावा, असे तहसीलदारांनी सांगितले. मात्र ठेकेदाराचे काम पूर्ण झाल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या शेतातील खासगी रस्ता बंद करण्यात आल्याने शिवरस्त्याची वाट मोकळी न करता शेतकरी वाऱ्यावर सोडल्याचे दिसत आहे.

‘सरकारी काम कितीही वर्ष थांब’ या म्हणीप्रमाणे सुमारे अठरा ते वीस शेतकऱ्यांना या अडचणीचा सामना करावा लागत आहे. आता मात्र उपोषण करावे लागणार, असे या शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

शेतकरी म्हणतात....

''आम्हाला अनेक वर्ष रेल्वेची जागा वापरायला मिळाली. हे अंतर कमी असल्यामुळे शिवरस्त्याचा वापर झाला नाही. परिणामी, शिवरस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून कब्जा बसवला व आमचा हक्काचा रस्ता हिरावून घेतला. आम्हाला न्याय मिळावा, अन्यथा आमरण उपोषण करू.'' - रामलाल शिंदे, तरवाडे

''रस्ता मागणीसाठी तहसीलदांकडे अर्ज देऊनही आमचा हक्काचा रस्ता मोकळा होऊ शकला नाही. आम्ही शेतीमाल कसा शेताच्या बाहेर काढावा. शेतांमध्ये बैलगाडी औत कसे घेऊन जावे. याबाबत महसूल विभागाने पर्याय द्यावा.'' - चिंधू अमृतकार, तरवाडे

''पावसाळ्यात शेती कशी करावी, शेतमाल बाहेर कसा काढावा, रासायनिक खते शेतात कशी घेऊन जावी, अशा अनेक समस्या डोळ्यासमोर आहेत. हक्काचे रस्ते अतिक्रमणधारकांनी गिळंकृत केले. तरीही महसूल विभागाकडून आम्हाला रितसर न्याय मिळत नाही. अतिक्रमणधारकांना पाठीशी तर घालत नाही, अशी शंका वाटत आहे.'' - रवींद्र शिंदे, तरवाडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT