Death  esakal
जळगाव

क्रुझर धडकेत शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

४६ वर्षीय शेतकऱ्यास लग्नाचे व्हऱ्हाड घेऊन निघालेल्या जीपने (क्रुझर) धडक दिली.

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा (जि. जळगाव) : पहाण (ता. पाचोरा) येथील ४६ वर्षीय शेतकऱ्यास भडगाव रोडवरील हॉटेल भाग्यलक्ष्मी गार्डनजवळ लग्नाचे व्हऱ्हाड घेऊन निघालेल्या जीपने (क्रुझर) धडक दिली. या अपघातात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. १८) घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहाण (ता. पाचोरा) येथील शेतकरी व पत्रकार संदीप महाजन यांच्या मावसभावाचा मुलगा प्रमोद पाटील (वय ४६) हे १८ जूनला सकाळी मोटारसायकलने चाळीसगाव येथे बैलजोडी बघण्यासाठी गेले होते. पाचोऱ्याकडे परत येत असताना हॉटेल भाग्यलक्ष्मी गार्डनसमोरील पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून निघालेल्या व पाचोऱ्याकडून भडगावच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या जीपने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात प्रमोद पाटील खाली पडून त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. प्रमोद पाटील यांना तत्काळ रुग्णवाहिका चालक बबलू मराठे यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी प्रमोद पाटील यांना मृत घोषित केले. त्यांचे तेथे शवविच्छेदन केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात क्रूझरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत प्रमोद पाटील यांच्या पाश्चात्य वृद्ध आई, वडील, पत्नी, एक भाऊ, एक मुलगी, एक मुलगा, दोन बहिणी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT