Agriculture news esakal
जळगाव

कमी जमिनीत नियोजनपूर्वक शेतीची कमाल; 2 एकरात शेतकऱ्याने घेतले तब्बल सव्वादहा लाखांचे उत्पन्न

वासुदेव चव्हाण

शहापूर (ता. जामनेर) : निसर्गाचा लहरीपणा.. शेतीसाठी मिळणारा खंडित व रात्रीचा वीजपुरवठा... त्यासाठी लागणारे शेतमजूर, महिला कामगार या साऱ्या अडचणींवर मात करीत गोद्री (ता. जामनेर) येथील समाधान पाटील या अल्पभूधारक शेतकऱ्याला दोन एकरात सव्वादहा लाख रुपयांचे केळीचे उत्पन्न मिळाले आहे. यासाठी श्री. पाटील यांना एक लाख रुपये खर्च आला आहे.

श्री. पाटील यांनी एक जानेवारीला (२०२२) दोन एकरमध्ये तीन हजार रोपांची लागवड केली होती. त्यासाठी ४५ हजार रुपये व इतर खर्च असे एकूण एक लाख रुपये खर्च झाला आहे. अकरा महिन्यात केळीचे घड तयार झाले असून, त्यांना सरासरी दोन हजार २५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.

श्री. पाटील यांच्या शेतातील विहिरीचे उन्हाळ्यात पाणी कमी झाले. त्यामुळे त्यांनी गोद्रीच्या प्रकल्पातून जलवाहिनीद्वारे केळीसाठी पाणी आणले होते. श्री. पाटील यांना या कामी त्यांचा मुलगा भूषण याचे सहकार्य लाभले. भूषण हा पदवीधर असून, तो शेतीच पाहतो.

नियोजन महत्त्वाचे : पाटील

शेती उत्पन्न याविषयी समाधान पाटील यांना विचारले असता श्री. पाटील यांनी सांगितले, की माझ्याकडे फक्त दोन एकर शेती आहे. मात्र शेती करताना नियोजन महत्त्वाचे आहे. अनावश्यक खर्च टाळून नियोजनपूर्वक आवश्यक खर्च केला तर कमी खर्चातही चांगले उत्पन्न येते, हा माझा अनुभव आहे. लॉकडाउनच्या काळात मी दोन हजार पिलबाग ठेवला होता. तेव्हाही मला सहा लाखांचे उत्पन्न मिळाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT