Farmer Sagar Patil took out a procession of a vehicle loaded with bananas from the farm to the village. esakal
जळगाव

Jalgaon News: शेतकऱ्याने काढली केळीने भरलेल्या वाहनाची मिरवणूक! मिळाला 3 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव

वासुदेव चव्हाण

Jalgaon News : राज्यभरात आज दिवसभर ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीची धामधूम सुरू आहे. (farmer took out procession of vehicle loaded with bananas jalgaon news)

मात्र येथील सागर विजय पाटील या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात काढलेल्या केळीच्या घडाने भरलेल्या वाहनाची थेट शेतापासून तर गावापर्यंत सवाद्य काढलेली मिरवणूक चर्चेचा विषय ठरली आहे.

श्री. पाटील हे दरवर्षी केळी लागवड करतात व त्या पिकाची योग्य निगा ठेवून चांगले दर्जेदार उत्पन्न काढण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

यावर्षी त्यांनी चार एकरात कोणत्याही केळी रोपांची लागवड न करता घरच्याच सात हजार बेण्याची लागवड केली आहे.

आज त्यांनी तीन हजार रुपये प्रतिक्विंटल भावाने एकशेसाठ क्विंटल केळीची काढणी केली. घरच्या बेण्याची लागवड केलेल्या केळीचे दर्जेदार उत्तम प्रतीचा माल असल्याने त्यास भावही चांगला मिळाल्याने श्री. पाटील यांनी आज त्या केळीच्या घडाने भरलेल्या वाहनाची सवाद्य मिरवणूक काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT