Damaged crop due to bogus fertilizer.  esakal
जळगाव

Jalgaon Fake Fertilizer : बोगस खतामुळे कापूस उपटून फेकण्याची वेळ; पंचायत समिती, कृषी विभागाचे एकमेकांकडे बोट

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fake Fertilizer : सरदार अॅग्रो फर्टिलायझर गुजरात या कंपनीच्या बोगस खतामुळे पातोंडा येथील शेतकरी भरत पाटील व इतर (१ हेक्टर), राजेंद्र सूर्यवंशी (२ हेक्टर ४० आर) , युवराज पाटील (९१ आर) यांच्या शेतातील कपाशीचे पिक उपटून फेकण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

सरदार अॅग्रो फर्टिलायझर कंपनीचे खत निकृष्ठ दर्जाचे असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळण्याअगोदरच शेतकऱ्यांकडून खताची पहिली मात्रा कापूस पिकाला देण्यात आली होती. (farmer uprooted damage crop due to fake fertilizer jalgaon news)

पिकाला खत दिल्यानंतर साधारण पंधरा ते एकवीस दिवसानंतर त्याचे दुष्परिणाम पिकावर दिसून येऊ लागल्यावर शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आता कापूस पिक वखरून नष्ट करणे हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. परंतु पंचायत समिती अमळनेर व कृषी अधिकारी कार्यालय अमळनेर येथे लेखी स्वरूपात तक्रार करून देखील संबधित अधिकारी प्रत्यक्ष परिस्थितीचा पंचनामा करायला शेतावर यायला तयार नाहीत.

शेतकरी कृषी विभाग व पंचायत समितीच्या चकरा मारतोय पण अधिकारी आपल्या अधिकारीपणा मिरवण्यात मशगूल आहेत. कुणीही व्यवस्थित उत्तर तर देतच नाही, उलट दोन्ही कार्यालये या प्रकरणाचा पंचनामा करण्यासाठीची जबाबदारी एकमेकांकडे ढकलाढकल करीत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सरदार अॅग्रो रासायनिक खत उत्पादक कंपनीच्या चुकीच्या खतामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळवून देणे, ही शासकीय कार्यालयांची जबाबदारी नाही का? की कंपनी व खत विक्रेते यांच्याशी अधिकाऱ्यांचे संगनमत झाले आहे, असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.

"माझी व भावांच्या शेतातील कापूस पिकावर सरदार अॅग्रोचे खत वापरल्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत अमळनेर कृषी अधिकारी व पंचायत समिती कार्यालयात ९ ऑगस्टला लेखी तक्रार नोंदवली आहे. दोन्ही कार्यालयातील अधिकारी पंधरा दिवस उलटूनही पंचनामा करायला तयार नाहीत. विचारणा केली असता उलटसुलट उत्तरे मिळतात. शासनाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात जातीने लक्ष घालून नुकसान भरपाई मिळवून द्यावी." - भरत पाटील , शेतकरी, पातोंडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:विहिरीत पडला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

SCROLL FOR NEXT