Jalgaon Cotton Counting
Jalgaon Cotton Counting esakal
जळगाव

Jalgaon News : आंबेहोवळच्या शेतकऱ्यांची कापूस मोजणीत फसवणूक; कपाशीसहित ट्रक जप्त

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : तालुक्यातील आंबेहोवळ (लोंजे) येथील शेतकऱ्यांची कपाशी मोजताना एका तोल (४० किलो) मागे १३ किलो कमी दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याची तक्रार दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे येथील ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिस ठाण्यामध्ये कपाशीसहित असलेला ट्रक (एमएच १८, एम ९६२२) व शेतकरी तक्रार करण्यासाठी आले होते. मात्र, ट्रकचालक फरारी झाला होता.

याबाबत शेतकऱ्याने आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे तक्रार केली. त्यावरून लांबेहोवळ लोंजे येथील फसवणूक झालेले शेतकरी साहेबराव पद्मसिंग चव्हाण, प्रेमचंद रामराव चव्हाण, जगन मंगतु राठोड, सीताबाई सलतान चव्हाण आणि अंकुश सुकलाल राठोड यांची आमदार चव्हाण यांनी भेट घेतली.

सर्व शेतकऱ्यांनी कैफियत सांगितल्यानंतर आमदार चव्हाण यांनी शेतकरी व ट्रकसहित पोलिस ठाण्याला आले आणि पोलिस निरीक्षक जाधव यांची भेट घेऊन पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.

साहेबराव चव्हाण यांनी २९ क्विंटलचे ७४ तोल झाले. जगन राठोड यांच्या १६ क्विंटल मालाचा ४० तोल, प्रेमचंद चव्हाण यांचे ९ क्विंटलचे ४० तोल, सीताबाई चव्हाण यांचे तीन क्विंटलचे २६ तोल झाले होते आणि प्रत्येक तोलमागे १३ किलो माल कमी दाखविला जात होता. पोलिस ठाण्यात त्या वजन काट्यावर कापूस मोजून खात्री करण्यात आली.

दरम्यान, अंकुश राठोड यांचा कापूस मोजत असताना, हे निदर्शनास आले. त्यांचा ७ क्विंटल ८०० माल होता, एक तोल ४० किलोचा वजन काट्यावर दाखविला जात होता. प्रत्यक्षात तो माल ५३ किलो असायचा. मात्र, त्या वजन काट्यावर १२ ते १३ किलो कमी दाखविला जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सर्व शेतकरी पोलिस ठाण्याला ठाण मांडून होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

Latest Marathi News Live Update : दररोज काहीतरी बोलणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT