Farmers waiting for heavy rains
Farmers waiting for heavy rains sakal
जळगाव

Jalgaon Rain Crisis : मायबाप सरकारने कृत्रिम पाऊस पाडावा! पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा टाहो

सुधाकर पाटील

Jalgaon Rain Crisis : जळगाव जिल्ह्यात पाऊस दांडी यात्रेवर गेल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रोज आकाशात ढग गर्दी करतात, पावसाचे वातावरण तयार होते, मुसळधार पाऊस होईल असे वाटते. मात्र पाऊसच पडत नाही.

या पाठ-शिवणीच्या खेळाने जिल्ह्यातील शेतकरी २० ते २५ दिवसांपासून हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेत २२ टक्केच पाऊस झाला आहे.

त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाची चाहुल लागत असून, मायबाप सरकारने पिके वाचविण्यासाठी कृत्रीम पाऊस तरी पाडावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (farmers demanding artificial rain in jalgaon news)

जून महिन्यात वेळेवर पडलेल्या पावसाच्या भरवशावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, आता काही भागात १५ ते २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे.

आकाशात पावसाच्या ढगांऐवजी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारे ढग रोज अंधार करत आहेत. त्यामुळे अगोदरच कापसाच्या पडलेल्या भावामुळे नैराशात असलेला बळीराजा आणखीनच अडचणीत सापडला आहे.

पावसाने फिरविली पाठ

जुनच्या दुसऱ्या- तिसऱ्या आठवड्यात दमदार पावसाच्या सलामीने शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी करून टाकली. त्यानंतरही पावसाने हजेरी लावली. मात्र पिक ऐन मोसमात असताना पावसाने पाठ दाखविल्याने खरीप हंगाम दुष्काळाच्या गर्तेत सापडला आहे.

गिरणा पट्ट्यात तर गेल्या तिन वर्षानंतर प्रथमच भयावह परिस्थिती ओढावली आहे. ऑगस्टमध्ये चाळीसगाव तालुक्यात ८, भडगावला १५, तर पाचोऱ्यात २५ टक्केच पाऊस झालेला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कापसाची वाढ खुंटली

यंदा जिल्ह्यात पाच लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. त्यात २ लाख हेक्टर क्षेत्रावर पुर्वहंगामी, म्हणजे बागायती कापसाची लागवड करण्यात आली. ती वगळता ३ लाख हेक्टरवर वरूणराजाच्या भरवशावर कापसाची लागवड करण्यात आली. ती सध्या पुर्णपणे धोक्यात आली आहे. त्यांची वाढ पुर्णत: खुंटली आहे. त्यामुळे कापासाच्या उत्पादनातही मोठी घट होणार आहे.

७० टक्के पिकांना फटका

जुनमध्ये पडलेल्या पावसावर कापसाबरोबरच, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. सद्यस्थितीत त्यांना खतांचा डोस देण्यात आला आहे. अंतर्गत मशागतही पुर्णत्वास आली आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने ऐन मोसमात या पिकांना मोठा फटका बसला आहे. जवळपास ७० टक्के पिके वाया जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कोट्यवधींचा खर्च वाचेल

शासनाने शेतकऱ्याच्या या विदारक परिस्थितीचा विचार करून कृत्रिम पाऊस पाडावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. वातावरण ढगाळ असते, पण त्यात आद्रता नसल्याने पाऊस पडत नाही. त्यामुळे कृत्रीम पावसाचा प्रयोग केल्यास पिकांना फायदा होईल. पर्यायाने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी केलेला कोट्यवधीचा खर्च वाचू शकेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

आढावा बैठका आवश्यक

सद्यस्थितीत जिल्ह्यात दुष्काळाने डोके वर काढायला सुरवात केली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी तालुकानिहाय आढावा बैठका घेऊन उपाय योजनांबाबत सुचना देणे आवश्यक आहे. एकतर शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आता प्रशासनाने जागल्याची भुमिका घेऊन ग्राऊंड रिअ‍ॅलिटी तापसणे आवश्यक आहे.

"जिल्ह्यात आतापर्यंत शंभर टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सद्यस्थितीत पावसाने दडी मारल्याने पिकांची परिस्थिती नाजूक झाली आहे. पिकांची वाढ खुंटली आहे. गेल्या २-३ दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने पिक परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा आहे." -संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी अधिक्षक, जळगाव

"सद्यस्थितीत आर्द्रतायुक्त ढग आहेत. त्यामुळेच कृत्रिम पावसाला चांगला वाव आहे. कृत्रिम पाऊस पाडला, तर शेतकऱ्यांचा किमान उत्पादन खर्च तरी निघु शकेल. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे कृत्रिम पावसाची मागणी केली आहे." -एस. बी. पाटील, समन्वयक, शेतकरी कृती समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT