Success Story esakal
जळगाव

शेतकऱ्याचा मुलगा ‘न्यूरोलॉजी’त देशात पहिला

घरात एकही डॉक्टर नसताना मिळविले ‘गोल्ड मेडल

शंकर भामेरे

पहूर (ता. जामनेर) : पहूरसारख्या ग्रामीण भागात राहून त्याच ठिकाणी शिक्षण घेणारा विद्यार्थी परिस्थितीची कोणतीही तमा न बाळगता आपल्या हुशारीच्या जोरावर मजल दर मजल करीत पहूर गावाचे नाव देशपातळीवर उंचावतो, त्याचा सार्थ अभिमान आज पहूरकारांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

घरात एकही डॉक्टर नसताना मिळविले ‘गोल्ड मेडल

‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स’ने आयोजित केलेल्या परीक्षा सत्र डिसेंबर २०२० मध्ये न्यूरॉलॉजी (Neurology) या विषयात पहूर येथील डॉ. गोपाल अरुण घोलप ( एमबीबीएस, एमडी मेडिसिन, डीएनबी न्यूरॉलॉजी फेलो इंटरव्हेंशन न्यूरॉलॉजी) यांनी देशातून पहिला येण्याचा मान पटकावला. त्यांना या विषयात गोल्ड मेडल घोषित झाले आहे. त्यांनी या विषयातील शिक्षण कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल येथून प्राप्त केले. सध्या ते इंटरव्हेंशन न्यूरोरेडिओलॉजी (बीना टाक्याच्या मेंदूच्या शस्रक्रिया) चे शिक्षण मुंबई येथून घेत आहेत.

डॉ. गोपाल घोलप हे एका शेतकरी कुटुंबात जन्मले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पहूर पेठ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. इयत्ता चौथीत असतानाच शिष्यवृत्ती परीक्षेत चांगल्या गुणांनी यश संपादित करून चुणूक दाखविली. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. माध्यमिक शिक्षणासाठी पालकांनी जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि दहावी व बारावीच्या परीक्षेतही चांगले यश मिळविले. यानंतर मात्र काही तरी वेगळे करण्याची इच्छा व वडील अरुण घोलप यांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास उरारी बाळगून असलेल्या डॉ. गोपाल यांनी नीट परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात पाहिजे ते वैद्यकीय महाविद्यालय न मिळाल्याने दुसऱ्या प्रयत्नात २००७ मध्ये एन. टी. प्रवर्गातून राज्यात तेरावा क्रमांक प्राप्त करून एमबीबीएसचे शिक्षण मुंबई येथील केईएम वैद्यकीय महाविद्यालयात पूर्ण केले. २०१४ मध्ये एमडी प्रवेश परीक्षेत एनटी प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांकाने यश संपादित करून एमडी मेडिसीन पदवी प्राप्त केली. यावरही न थांबता शिक्षण सुरूच ठेवण्याचा निर्धार करीत डीएनबी न्यूरॉलॉजी प्रवेश परीक्षेत यश मिळवीत कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये शिक्षण पूर्ण करून याच हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असताना डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला असून, यात डॉ. गोपाल घोलप यांनी देशात अव्वल क्रमांक मिळवून पहूरचे नाव उज्ज्वल केले आहे.

यशाचे श्रेय आई, वडील अन् शिक्षकांना

डॉ. गोपाल घोलप हे आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमधील न्यूरॉलॉजी विभागातील सर्व शिक्षक, मित्र परिवार व पहूर येथील घोलप परिवाराला देतात. डॉ. गोपाल घोलप यांची पत्नी डॉ. आसावरी घोलप (एम.डी. पॅथॉलॉजी) या न्यूरो पॅथॉलॉजीचे शिक्षण केईएम हॉस्पिटल, मुंबई येथून घेत असून, लहान भाऊ डॉ. सिद्धांत घोलप (एम. डी. बालरोग तज्ज्ञ) असून, सद्य:स्थितीत लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात मुंबई येथे शिक्षण घेत आहे. तर दुसरा डॉ. अमोल घोलप जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे लहान मुलांचा दवाखान्यात सेवा देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : तिघांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा खात्मा, पिंपरखेडमध्ये शार्पशूटरने झाडल्या गोळ्या

Pune Weather : पुणे गारठणार! पुढील 3-4 दिवसांत तापमानात मोठी घट; हवामान विभागाचा अंदाज

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

SCROLL FOR NEXT